Home पुणे श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

164

 

 

पुणे -दौंड तालुक्यातील कानगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्याम ठाणेदार यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी दौंडच्या प्राईम स्केवर येथील सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेचे प्रमुख सदाशिव रणदिवे, नामदेव बापू ताकवणे ( सरचिटणीस ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, श्रीनाथ ननवरे दौंड शहर शिवसेना प्रमुख, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ प्रेमकुमार भट्टड, रील स्टार हर्षदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
श्याम ठाणेदार हे गेली २२ अध्यापन क्षेत्रात कार्य करीत असून दौंड तालुक्यातील विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर पोहचले आहेत. गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्याम ठाणेदार यांचे कानगाव ग्रामस्थ, पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here