Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘ सद्भावना दिवस’ कार्यक्रमाचे अयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘ सद्भावना दिवस’ कार्यक्रमाचे अयोजन

27

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने *सद्भावना दिवसाचे* आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील जिमखाना विभाग प्रमूख क्रांती क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री व्हि.पी.हौसे, महिला सहायक कार्यक्रमाधिकारी सौ. एस. बी. पाटील व जिमखाना विभागातील अमोल पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतीक एकात्मता टिकवण्यासाठी सद्भावना दिवसावर आधारित सर्व स्वयंसेवकांनी शपथ घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.विशाल हौसे यांनी केले. सद्भावना दिवसाचे महत्व, राष्ट्रिय एकात्मता टिकवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या नात्याने विविध जबाबदाऱ्या या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केली.महिला कार्यक्रम अधिकारी सौ.एस.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना सद्भावना दिवस स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी का साजरा केला जातो.विविधतेतून एकता प्रस्तापित करीत असताना सद्भावना दिवस सारखे दिवस साजरा करणे गरजेचे आहे असे सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित जिमखाना विभाग प्रमुख क्रांती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे आभार स्वयंसेवक भावेश यांनी मानले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here