चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन (खान्देश चॅप्टर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘PhD थेसीस रायटिंग’ या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा मंगळवार दि. २० ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेसाठी इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष प्रा.डॉ. वैभव सबनीस व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के.एन. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश, केरळ विद्यापीठ येथील प्रा. डॉ. सी.ए. लाल तसेच एथिराज महिला महाविद्यालय, चेन्नई येथील प्रा. डॉ. मंगरायरकरासी जे. हे उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रा. डॉ. लाल यांनी PhD संशोधनातील बारकावे या संदर्भात उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना अवगत केले. तसेच संशोधन कार्यात आवश्यक असलेली नैतिकता यासंदर्भात देखील मार्गदर्शन केले. तसेच प्रा. डॉ. मंगरायरकरासी जे. यांनी सदर कार्यशाळेत PhD साठी उपयुक्त असे विविध ई संसाधने बद्दल उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना अवगत केले. या राष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळेत देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील एकूण 300 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळेचे सुत्रसंचलन कार्यशाळा समन्वयक डॉ. दीनानाथ पाटील यांनी केले तर प्रास्ताविक खान्देश चॅप्टरचे निमंत्रक प्रा. डॉ. हेमांतकुमार यांनी केले. डॉ. स्वाती विहिरे व डॉ. किशोर ठाकरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. वैभव सबनीस, चोपडा महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. दीनानाथ एस. पाटील,
व एल्टाई खान्देश चॅप्टरचे प्रमुख डॉ. उमेश पाटील, निमंत्रक प्रा. डॉ. हेमंतकुमार पाटील आदींनी परीश्रम घेतले.