आपल्या आयुष्यात आपले आजी-आजोबा यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करतो. 1988 मध्ये, अध्य रोनाल्ड रेगन यांनी हीच समस्या लक्षात घेतली आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली. दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस “ज्येष्ठ नागरिक दिन” म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. वृद्धांवर परिणाम होणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जसे की, त्यांच्या आरोग्याच्या समस्या, तरुण लोक, कुटुंबातील किंवा घराबाहेरून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध समाजामध्ये जनजागृती केली जाते. 1991 मध्ये प्रथमच हा उत्सव साजरा करण्यात आला. युनायटेड स्टेट मध्ये राष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. हा दिवस मानवी समाजातील वृद्ध लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.
युनायटेड नेशन नमूद केल्याप्रमाणे वृद्ध लोकांची संख्या 2050 पर्यंत 1.5 अब्जपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. ही वाढ पूर्वी आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये ठळकपणे दिसून येईल. कमी विकसित राष्ट्रे 2050 पर्यंत या ग्रहावरील दोन तृतीयांश लोक वृद्ध लोकांचे आयोजन करेल व लोकसंख्येच्या वाढीचा व त्यांच्या सर्वांगीण कल्याण समर्थन देणारी एक मजबूत व्यवस्था अस्तित्वात असणे योग्य आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे मूळ 19 ऑगस्ट 1988 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनल्ड रिगन यांनी जाहीर केले होते. 5847 नावाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष यांनी केले. यामध्ये अमेरिकेमधील असलेले कुटुंब, समुदाय आणि राष्ट्रातील वृद्ध लोकांच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला होता. युनायटेड स्टेट काँग्रेसने 138 क्रमांकाच्या हाऊस जॉइंट रेझोल्युशन पास केला. ज्यामध्ये रोनल्ड रिगन यांनी दरवर्षी ऑगस्टचा तिसरा रविवार ‘राष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन’ म्हणून घोषित करण्याची परवानगी दिली. अनेक वृद्ध लोक त्यांच्या मुलाकडून अत्याचार होत असल्याची तक्रार करतात त्यांना त्यांच्या मुलांकडून त्रास होतो अनेक जण आपल्या वृद्ध आई-वडिलांना ओझे मानतात. काही लोक त्यांना वृद्धाश्रमात टाकतात आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करतात. वृद्धांचे अशा समस्येला तोंड देण्यासाठी दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वृद्धांच्या समस्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
आरोग्य बिघडणे आणि वृद्धांवरील अत्याचार यासारख्या वृद्ध व्यक्तींवर परिणाम करणारे घटक आणि समस्यांबद्दल जागरूकता वाढविणे हा या दिवसाचा उद्देश आहे. कायद्यानुसार भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ति (स्त्री किंवा पुरुष) ज्याचे वय साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते “ज्येष्ठ नागरिक” मध्ये येतात. साधारणपणे असे मानले जाते की जो कोणी 60 किंवा 65 वया पर्यंत पोहोचतो तो ज्येष्ठ नागरिक बनतो. हे धोरण शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित समस्या, “सर्वात वृद्ध वृद्ध” आणि वृद्ध महिलांच्या विशेष गरजा हाताळते. भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे, हे राज्य सरकारही आपले सामाजिक कर्तव्य मानते. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहेत. या वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आहार, वैद्यकीय उपचार आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात.
आपल्या प्रियजनांचे संघर्ष जाणून घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ज्येष्ठतेचे वय समजून घेणे खूप महत्वाचे आहे. नियमांनुसार किमान 60 वर्षे वयोगटातील पुरुष ज्येष्ठ नागरिक आणि किमान 58 वर्षे वयाच्या महिला ज्येष्ठ नागरिकांना मेल/एक्स्प्रेस/राजधानी/शताब्दी/ जनशताब्दी/दुरांतो गटाच्या सर्व वर्गांच्या भाड्यात सवलत दिली जाते. या करीता सवलतीचा घटक पुरुषांसाठी 40% आणि महिलांसाठी 50% आहे. गेल्या जनगणनेनुसार सुमारे 15 दशलक्ष वृद्ध एकटे राहतात आणि त्यापैकी तीन चतुर्थांश महिला आहेत. पारंपारिकपणे, भारतात, वृद्धांना नेहमीच आदराने वागवले जाते आणि कुटुंबात त्यांना एक प्रमुख स्थान दिले जाते. आज ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा होत आहे, त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !
प्रविण बागडे, नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com