अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड-दि.२० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितिचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृति दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा ते जायकवाडी कमान,कोद्री रोड गंगाखेड पर्यंत सकाळी ०६:०० वाजता “निर्भय मॉर्निंग वॉक” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी “फुले, शाहु,आंबेडकर…!आम्ही सारे दाभोळकर…!! अमर रहे,अमर रहे… नरेंद्र दाभोळकर,अमर रहे” “विवेकांचा आवाज.बुलंद करुया “अशा घोषणा देत ‘ निर्भय मॉर्निंग वाक’ कार्यक्रम मार्गदर्शन करत संपन्न करण्यात आला.याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निर्भय मॉर्निंग वॉक कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.विलासराव जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मार्गदर्शन करताना विलास जंगले यांनी, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुढाकारातूनच जनसामान्य माणसात पोहोचले त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा करण्यास सरकारला भाग पाडले, या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्या सोबत प्रा. डॉ. एम. डी. इंगोले, शिक्षक नारायण साळवे, प्रकाश शिंगाडे, सूर्यमाला मोतीपवळे, राहुल साबने, राजेश समुद्रे, राहुल गायकवाड, रोहीदास लांडगे, गोटमुकले सर, रमेश कातकडे, भिमराव कांबळे, फड साहेब, उत्तम काळे आदीचि उपस्थिती होती.