*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*.
म्हसवड : राष्ट्रीय स्वराज्य सेना हा महायुतीचा घटक पक्ष असताना भारतीय जनता पार्टी वर नाराज असल्याने राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी तयारी सुरु केली आहे .२०१४ ,२०१९ लोकसभा विधानसभा व लोकसभा -२०२४ व त्या काळातील सर्व निवडणूकीत राष्ट्रीय स्वराज्य सेने ने भाजपा चे महायुती चे एक छोटा मीत्र पक्ष म्हणून काम केले होते . महायुती चा घटक पक्ष असताना सरकार मध्ये काम करण्याची संधी किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये तिकीट न दिल्याने व राज्यपाल कोट्या तुन किंवा विधानपरिषदेत संधी न दिल्याने नाराज असल्याने व भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब व महायुती चे समन्वय यांनी दिलेला शब्द न पाळल्याने नाराज असताना व पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केल्याने नाराज महायुती चा मीत्र पक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर विधानसभा -२०२४ निवडणूक लढवत आहे .यांचा फटका समविचारी मतांचे विभाजन होऊन महायुती चे उमेदवारांना बसणार असे अध्यक्षांनी या वेळेस सागीतले. सरकारने ५० % च्या आत ओबीसी मधुन मराठा आरक्षण न दिल्याने नाराज मराठा समाज हा राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांला मतदान करणार असे आता गावा गावात ठराव ही होउ लागले आहेत. मराठा व धनगर समाजाला न्याय सरकारने नदिल्याने नाराज इतर समाज राष्ट्रीय स्वराज्य सेने चा पाठीमागे आहे असे हि या वेळेस पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी बागल म्हणाले की आमच्या पक्षाचे राज्यभरात 25 लाखापर्यंत समर्थक आहेत त्या बळावर आमचा पक्ष महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवत आहे . पक्षाचे महाराष्ट्रात एकुण २८८ उमेदवारांपैकी पहिली यादीत अता पर्यन्त २२ उमेदवार नक्की झालेले आहेत. पक्षाची ७५ विधानसभेत हि चांगली ताकद आहे व या विधानसभेत पक्षांचे उमेदवार विजयी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे . प्रत्येक उमेदवार चांगले मतदान घेऊन युती व आघाडी चा उमेदवारा समोर चांगलेच आवाहान देउन विजयश्री घेऊन येतील. या वेळेस राष्ट्रीय स्वराज्य सेने बरोबर अनेक NGO , अनेक मीत्र पक्ष , कामगार संघटना, सामाजिक संघटना एकत्र मीळुन तीसरी आघाडी तयार केली आहे.मा.श्री मनोज दादा जंरागे पाटील साहेब, बच्चु कडु साहेब राजु शेट्टी साहेब व एतर प्रमुख लोकांशी बोलणें चालू आहे.राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे सर्व उमेदवार हे उच्च शिक्षीत असुन सर्वसामान्य शेतकरी घरातील असुन त्याचा पाटीमागे मोठे मताधिक्य vote bank असुन सर्वसामान्य जनता तेच्या पाठीमागे आहे.