चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठ नामविस्तार सोहळा’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. याप्रसंगी प्र. रजिस्ट्रार डी. एम. पाटील, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, डॉ. एम. एल. भुसारे, वाय. एन. पाटील, डॉ. एम. बी. पाटील, डॉ. ए. एच. साळुंखे, डी. पी. सोनवणे तसेच एन. पी. सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘बहिणाबाई यांच्या कविता मानवी जीवनाचे तत्वज्ञान उलगडून दाखवितात. बहिणाबाई स्वतः अशिक्षित असून देखील त्यांनी कवितेद्वारे निसर्गाचे मानवी जीवनाशी असलेले नाते स्पष्ट करून कवितेला नवे वळण देण्याचे अनमोल कार्य केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कविता वाचून जीवनात उतरवले पाहिजे.’ यावेळी समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यानिमित्ताने महाविद्यालयात निबंध, काव्यवाचन इत्यादी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.