Home महाराष्ट्र ७८ व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनी उत्कृष्ठ आयुर्विमा प्रदात्यांचा शाखेतर्फे गौरव

७८ व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनी उत्कृष्ठ आयुर्विमा प्रदात्यांचा शाखेतर्फे गौरव

152

 

साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण साकोली शाखेचे शाखाधिकारी महेश पांढरे यांचे हस्ते संपन्न झाले. आयोजित एल आय सी सभागृहात स्वतंत्रता दिवस स्पर्धेत मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर सी एल आय ए यांच्या समुहास चंदु लिखार सहाय्यक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून या मार्गदर्शनामुळे समुह अभिकर्त्यांनी स्पर्धेत ७१ पॉलिसी पुर्ण केल्या. अभिशेक निखाडे यांनी ११ पॉलिसी पुर्ण करीत शिल्ड प्राप्त केले. ( १५ ऑगस्ट ) ला संपन्न या सोहळ्याला त्यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी साकोली शाखेचे शाखाधिकारी महेश पांढरे, लाखनी शाखेचे शाखाधिकारी किशोर शहारे, सहा. शाखाधिकारी शुभम शहारे व एल आय सी साकोली शाखेचे सर्व कर्मचारीवृंद सोहळ्याला उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक जनतेच्या पुढील भविष्याची काळजी घेत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना समोर काही आर्थिक त्रास जाणवणार नाही हेच “योगक्षेम वहाम्यहम्” या ब्रिदवाक्याचा प्रत्येकांनी बोध घेत भारतीय आयुर्विमा महामंडळाचे हर घर विमा या ध्येयातून “सर्वसामान्यांना आधार यातूनच भविष्याचा विचार” हा आपण संकल्प मनात ठेवून कार्यकुशलतेने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. सत्कारात अभिशेक निखाडे ११ पॉलिसी, नरेश कुरंजेकर ११ पॉलिसी, अनिता पटले ७ पॉलिसी, प्रीति कटरे ६ पॉलिसी, दिव्या निंबेकर ६ पॉलिसी, प्रमोद गजभिये ५ पॉलिसी, प्रमोद ठाकरे ४ पॉलिसी, हेमराज चांदेवार ४ पॉलिसी यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे पुजा कुरंजेकर यांचा एल आय सी मिशन समुह साकोली शाखेत स्वतंत्रता दिवस स्पर्धेत ७१ पॉलिसी करीत प्रथम स्थानावर आला. मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर यांनी या यशाबद्दल पुर्ण श्रेय समुहातील अभिकर्त्यांना व शाखेतील समुहाचे मार्गदर्शक चंदु लिखार यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here