अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-गंगाखेड येथील संत जनाबाई नगरात राहणाऱ्या माणिक अंगदराव घरजाळे यांच्या मुलाच्या आजारांवर जादुटोण्याद्वारे उपचार करुन मुलाचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून माणीक घरजाळे यांच्या कडुन 439500/रु उकळुन त्यांच्या कडुन वेळोवेळी फोन पे व नगदी पैसे घेवुन त्यांची फसवणुक केल्याची तक्रार गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळेच जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक दिपक कुमार वाघमारे यांच्या आदेशा नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर,पोलीस कॉन्स्टेबल राजु परसोडे यांनी आरोपीला पकडण्यासाठी परिश्रम घेतले. परंतु आरोपी मिळुन येत नव्हता पण पोलीसानी त्याच्या मुसक्या आवळायच्याच असा चंग बांधल्याने अखेर मुख्य आरोपी कुकाजी भिमराव मिसाळ वय 54 याला सुलतानपुर ता.लोणार जि.बुलढाणा येथुन अटक करण्यात यश आले मुख्य आरोपी पकडल्याने गंगाखेडअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दिपक कुमार वाघमारे,तपास अधिकारी मल्हार शिवरकर यांचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले तर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी कुकाजी भिमराव मिसाळ याला पोलीस कोठडी सुनावली आहे..