_जागतिक अवयवदान दिन हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे जो यूएसए मध्ये 1954 मध्ये झालेल्या पहिल्या जिवंत दात्याच्या अवयव प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ आहे. अवयवदान जनजागृती करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो._
जगभरात दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दान दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट आहे, लोकांमध्ये अवयव दानाबाबत जागरूकता वाढवणे आणि अवयव दानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे. अनेक गंभीर आजारांमध्ये अवयव प्रत्यारोपण हेच एकमेव उपाय असतो. परंतु, अवयव दान करणार्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर अवयव मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अवयव दानामुळे मरणोत्तरही एखाद्याचे जीवन उपयोगी ठरू शकते. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसं इत्यादी अवयव इतर गरजू रुग्णांसाठी वापरले जाऊ शकतात. एका अवयव दानाने आठ ते दहा जणांचे जीव वाचवले जाऊ शकतात.
आपल्या देशात आणि समाजात अवयव दानाबाबत अनेक गैरसमज आणि भीती आहेत. म्हणूनच, जागतिक अवयव दान दिनाचे उद्दिष्ट आहे या विषयावर खुली चर्चा घडवून आणणे, जनजागृती करणे, आणि जास्तीत जास्त लोकांना अवयव दानासाठी प्रोत्साहित करणे. अवयव दान हा एक परोपकारी आणि महान कार्य आहे, ज्यामुळे आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो. जागतिक अवयवदान दिन हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे जो यूएसए मध्ये सन १९५४मध्ये झालेल्या पहिल्या जिवंत दात्याच्या अवयव प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ आहे. अवयवदान जनजागृती करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
ध्यानं परं कृतयुगे त्रेतयां ज्ञानमुच्यते|
दवापरे यज्ञमेवाहू: दानमेव कलौयुगे||
कृत युगात ध्यान, त्रेता युगात ज्ञान, द्वापार युगात यज्ञ आणि कलियुगात दान हे साधन असल्याचा उल्लेख कुर्म पुराणात आढळतो. कलियुगात दानाला महत्व दिले असल्याने भुदान, गोदान, संपत्तीचे दान, अन्नदान, वस्त्रदान, नेत्रदान, रक्तदान, किडणीदान, या स्वरूपाचे दान आवश्यक केल्याचे आढळून येते. पौराणिक कथांमध्ये दधिची ऋषींनी वृत्तसुराला मारण्यासाठी आपल्या अस्थींचे इंद्राला दान दिले होते, शिबी राजाने कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अंगावरचे मासं दान दिले तर कर्णाने जन्मत:च शरीराचा एक भाग म्हणून लाभलेले कवच-कुंडले दान केले. अशा पौराणिक कथा ऐकल्यानंतर वाटतं की, पुराण काळापासूनच अवयव दानाची संकल्पना रूढ आहे. त्यावरूनच पुराण काळापासून भारतीय संस्कृतीत दानाचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे लक्षात येते. ऑगस्ट २०१६पासून राज्यात अवयवदानाविषयी विविध उपक्रम राबवले जात आहेत. सर्वच माध्यमातून अवयवदान करण्याबाबत जनजागृती होत असून दिवसेंदिवस अवयवदानाच्या मोहिमेला समाजातून प्रतिसाद मिळत आहे. परंतू तो प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्यांची संख्या त्यामानाने कमी आहे. अवयवदान करणाऱ्या व्यक्तिंपेक्षा गरजू व्यक्तिंची यादी मोठी आहे. त्यामुळे अवयवदान करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदविणे आश्यक आहे. वैद्यकिय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अवयवदान करण्याची प्रक्रिया काही प्रमाणात सोपी झाली आहे.
अवयवदान हे दोन प्रकारे करता येते- १) जिवंतपणी करता येणारे अवयवदान आणि २) मरणोत्तर करण्यात येणारे अवयवदान. जिवंतपणी अवयवदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वयक केंद्र या अधिकृत संस्थेची परवानगी असते. अवयवदानानंतर दात्याच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते. त्यामुळे जिवंतपणी किडणी व यकृताचे काही प्रमाणात दान करता येते. तसेच रक्त हे देखील मानवी शरीराचा अविभाज्य भाग आहे. मानवी शरीराचे संतुलन राखण्यासाठी रक्ताची निर्मिती होत असते. त्यामुळे ठराविक कालावधीमध्ये रक्तदान करणे हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगण्यात येते. मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे तपासले जाते. त्याअंतर्गत हृदय बंद पडून होणारा मृत्यू जसे वृद्धापकाळाने किंवा नैसर्गिक मृत्यू असतो. नैसर्गिक मृत्यूनंतर आपण फक्त नेत्रदान, त्वचादान आणि हृदयाच्या झडपा दान करू शकतो. मेंदू बंद पडून होणारा मृत्यू म्हणजे ज्याला ब्रेन डेथ संबोधले जाते. यामध्ये मेंदूला इजा झाल्याने माणसाचा मृत्यू होतो. अशा मृत्यूमध्ये माणसाचा फक्त मेंदू मृत पावलेला असला तरीही हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस हे सर्व अवयव चालू स्थितीत असल्याने त्यांचे दान करता येते.
मेंदूमृत व्यक्ती व कोमामध्ये गेलेली व्यक्ती यामध्ये बराचसा फरक आहे. कोमामध्ये असलेल्या व्यक्तिच्या मेंदूचे कार्य चालू असते आणि त्यामुळे कोमामध्ये गेलेली व्यक्ती शुद्धीवर येण्याची शक्यता असते. परंतु मेंदूमृत झालेली व्यक्ती कधीही परत जिवंत होऊ शकत नाही. म्हणून मेंदूमृत व्यक्ती मृत्युसमयी दवाखान्यात आयसीयुमध्ये असेल व मृत्यूपूर्वी अवयवदान करण्याचे संबंधित व्यक्तीने जाहीर केले असेल तरच अवयवदान करता येऊ शकते. असे करण्यासाठी कमीत कमी चार डॉक्टरांच्या समितीने त्या व्यक्तीची तपासणी करून त्यास मेंदूमृत घोषित करणे कायद्याने बंधनकारक आहे. मृत्यूनंतर नेत्र, मेंदू, ह्रदय, त्वचा अशा विविध अवयवांचे दान करून एक व्यक्ति दोन-तीन व्यक्तिंच्या रूपाने जिवंत राहू शकते. श्रीलंकेसारखा छोटासा देश नेत्र निर्यातीत जगात पहिल्या स्थानावर आहे. अनेक देशात मृत व्यक्तिने मरण्याआधी आपले अवयवदान करू नये, असे स्पष्ट जाहीर केले असेल तरच त्या व्यक्तिचे अवयवदान केले जात नाही. अन्यथा प्रत्येक व्यक्तिची अवयवदानाला मान्यता आहे, असे मानून त्याबाबत त्वरीत कार्यकाही करण्यात येते. आज अवयवदानाविषयी सर्वस्तरावर जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. अवयवदान व देहदान या दोन्हीमध्ये फरक आहे. अवयवदान हे जिवंतपणी व मरणानंतरही करता येते. मृत्यूपश्चात करण्यात येणाऱ्या अवयवदानानंतर मृत शरीर हे नातेवाईकांच्या ताब्यात देताना ते व्यवस्थित प्रक्रिया करून दिले जाते. ज्यामुळे एखादा अवयव काढून घेतल्याच्या कोणत्याही खुणा दर्शनी भागावर दिसून येत नाहीत. त्यामुळे अवयवदान केल्यानंतर धार्मिक विधी करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अवयवदान करताना शरीरातील ठराविक अवयवच दान केले जातात. परंतू देहदान हे फक्त मरणानंतरच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना मानवी शरीराच्या अभ्यास, प्रात्यक्षिक व संशोधन करण्यासाठी दिले जाते. देहादानानंतर असे मृत शरीर धार्मिक विधी करण्यासाठी नातेवाईंकांकडे दिले जात नाही तर ते फक्त संशोधनासाठीच वापरले जाते.
कोणत्याही स्वरूपाचे दान असो ते गरजू व्यक्तिंना केले तर त्याला अधिक महत्व प्राप्त होते. आपल्याकडील संपत्ती ही गरजूंना दान केल्यास ईश्वरभाव प्राप्त होतो, असे म्हणतात. त्याअनुषंगाने नाशवंत मानवी शरीर मातीत विलीन करण्यापेक्षा आपली देहरूपी संपत्ती मरणोत्तर दान केली तर अनेकांचे प्राण वाचविल्याचे पुण्य प्राप्त होईल. असे अवयवदान करणारा दाता मरणानंतरही जीवन जगतो असे म्हणता येईल. अवयव दान ही प्रक्रिया आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा अवयव काढून दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यास अधिकृत करते, कायदेशीररित्या, एकतर देणगीदार जिवंत असताना संमतीने, मृत्यूपूर्वी केलेल्या मृत देणगीसाठी कायदेशीर अधिकृततेद्वारे किंवा मृत देणगीसाठी. कायदेशीर नातेवाईकांच्या अधिकृततेद्वारे
देणगी संशोधनासाठी असू शकते किंवा अधिक सामान्यपणे, निरोगी प्रत्यारोपण करण्यायोग्य अवयव आणि ऊती दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्यासाठी दान केले जाऊ शकतात. सामान्य प्रत्यारोपणामध्ये मूत्रपिंड, हृदय, यकृत, स्वादुपिंड, आतडे, फुफ्फुसे, हाडे, अस्थिमज्जा, त्वचा आणि कॉर्निया यांचा समावेश होतो. काही अवयव आणि ऊती जिवंत दात्यांद्वारे दान केल्या जाऊ शकतात, जसे की मूत्रपिंड किंवा यकृताचा काही भाग, स्वादुपिंडाचा काही भाग, फुफ्फुसाचा काही भाग किंवा आतड्यांचा काही भाग, परंतु बहुतेक दान दात्याने केल्यानंतरच होतात. सन २०१९साली स्पेनमध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये ४६.९१ हा जगातील सर्वाधिक देणगीदार दर होता, त्यानंतर यूएस- ३६.८८ प्रति दशलक्ष, क्रोएशिया-३४.६३ प्रति दशलक्ष, पोर्तुगाल-३३.८प्रति दशलक्ष आणि फ्रान्स- ३३.२५ प्रति दशलक्ष देणगीदार दर ठरविण्यात आला. दि.२फेब्रुवारी २०१९पर्यंत युनायटेड स्टेट्समध्ये १,२०,००० लोक जीवरक्षक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होते. यापैकी ७४,८९७ लोक रक्तदात्याच्या प्रतीक्षेत सक्रिय उमेदवार होते. अवयवदानाबाबतचे मत सकारात्मक असले तरी, जागतिक स्तरावर अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या तुलनेत नोंदणीकृत दात्यांच्या संख्येत मोठी तफावत आहे. अवयव दात्यांची संख्या वाढवण्यासाठी, विशेषत: कमी लोकसंख्येमध्ये, सध्याच्या पद्धतींमध्ये ऑप्टिमाइझ केलेल्या सोशल नेटवर्क हस्तक्षेपांचा वापर करणे, सोशल मीडिया वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी अवयव दानाबद्दल तयार केलेली शैक्षणिक सामग्री उघड करणे समाविष्ट आहे. अवयवदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळला जातो. कारण अवयवदान काळाची गरज भासू लागली आहे.
!! आंतरराष्ट्रीय अवयव दान दिनाच्या सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.