Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये नशा मुक्त भारत अभियान

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये नशा मुक्त भारत अभियान

66

 

कराड :(दि. 12, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये राष्ट्रीय सेवा योजना यांच्याद्वारे नशा मुक्त‌ भारत अभियान राबविण्यात आले.
15 ऑगस्टचे औचित्य साधून, भारत सरकार व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभाग यांच्यावतीने नशा मुक्त भारत निर्माण करण्यासाठी यावर्षी विकसित “भारत का मंत्र विकसित भारत हो नशा से स्वतंत्र” हे ब्रीदवाक्य घेऊन नशा मुक्त भारत अभियान राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने कार्यक्रम अधिकारी प्रा.‌ एस. एस. बोंगाळे यांनी नशा मुक्त भारत अभियाना विषयी माहिती देऊन नशा मुक्त शपथ विद्यार्थ्यांना दिली. तसेच नशा मुक्त भारत अभियान याविषयीचे कु. प्रतीक्षा जाधव हिने तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे NSS विभाग प्रमुख प्रा. एस. एस. बोंगाळे व डॉ. एन ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. आर. आर. थोरात, प्रा. पी. एस. कराडे, प्रा. श्रीमती एस. एम. चव्हाण, प्रा. डॉ. एन. एस. देसाई, प्रा. आंबेकरी, प्रा. चोपडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here