Home चंद्रपूर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याची महा.पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याची महा.पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

223

 

 

चंद्रपूर -जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे सन २०२४ मधील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सुधाकरजी अडबाले शिक्षक आमदार यांचे दिनांक २६ जुन २०२४ च्या आढावा सभेत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिका-यांनी प्रश्र उपस्थित केलेला होता, तेव्हा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात कार्यक्रम ठरविण्यात येईल असे सुचित केले होते. मात्र आजमितीस कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
कक्ष अधिकारी महसूल व वनविभाग मंत्रालय महा.शासन मुंबई यांचे पत्र क्र.बदली-२०२४ /प्र. क्र. १००/ ई-७ दिनांक १/०८/२०२४ च्या पत्रान्वये महसूल व वन विभागातील गट-ब, गट-क व गट –ड संवर्गात बदलीसाठी पात्र असणा-या कर्मचा-यांची महा. शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य् पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५मधील नियम ४(४) नुसार ,सदर कर्मचा-यांच्या बदल्या दिनांक १५/ ०८/ २०२४ पर्यंत करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिलेले आहे. मात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदली संदर्भात सदर पत्रात उल्लेख नसल्याने व ग्रामविकास विभागाने पत्र निर्गमीत न केल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे.
सन २०२४ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेले नाही परिणामी ब-याच वर्षापासून (५ वर्षापासून) एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अन्याय झालेला आहे म्हणून महसूल व वन विभागाच्या पत्राच्या धर्तीवर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन करण्यासाठी शासनस्तरावरुन विशेषकरुन ग्रामविकास मंत्रालय यांचेकडून जिल्हा परिषद चंद्रपूर ला आदेश व्हावे व दिनांक ३१ /०८/२०२४ पर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संवर्गाच्या बदल्या करण्याची कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामविकासमंत्री,प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय, महा. शासन यांचेकडे महा. पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यनेते विजय भोगेकर,राज्याध्यक्षा महिला पुरोगामी मंच डॉ.अल्का ठाकरे, राज्यसरचिटणीस हरीश ससनकर, नारायण कांबळे ,दिपक व-हेकर, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, सुरेश गिलोरकर,शालिनी खटी, पौर्णिमा मेहरकुरे, गंगाधर बोढे, सुनिल कोहपरे, लक्ष्मण खोब्रागडे, दिवाकर वाघे यानी एका निवेदनावारे केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here