मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा व नियोजन करण्यासाठी दिनांक 09 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा राज्यस्तरीय विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय एससी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अनिस अहमद, आमदार राजेश राठोड, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, एस सी विभागाचे उपाध्यक्ष राहुल साळवे, नंदकुमार मोरे, डॉ पवन डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन विजयकुमार भोसले, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व प्रशासन नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष (एससी विभाग ) किशोर केदार व इतर प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यांप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष (एससी विभाग ) किशोर केदार यांच्या पुढाकाराणे व प्रयत्नातून
पँथस रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले प्रमुख नेते
प्रा. निवृत्ती आरु (पँथर्स रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष), समाधान वानखेडे, (प्रदेश कार्याध्यक्ष), विलासराव आहिरे, (प्रदेश उपाध्यक्ष), राजेश बोडदे (राज्य संघटक), राहुल वाघ (राज्य प्रसिद्धी प्रमुख) यांचेसह पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे नाशिक, अहमदनगर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, संभाजी नगर येथील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले व एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.