Home चंद्रपूर शहीद स्म्रुती दिन सोहळ्याचे निमित्ताने शहिदांना नमन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16...

शहीद स्म्रुती दिन सोहळ्याचे निमित्ताने शहिदांना नमन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 ऑगस्टला चिमूर क्रांतीभूमीत!

110

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

चिमूर- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १६ ऑगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीचे अमुल्य योगदान आहे. सदर अविस्मरणीय क्रांतीला 82 वर्षे पुर्ण होत आहेत. चिमूर क्रांती लढ्याचे स्मरण करण्याचे दृष्टीने दरवर्षी शहीद स्मृती दिन सोहळ्याचे आयोजन चिमूर क्रांती भूमीत केले जाते.
यावर्षी या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली.

देशात इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा देश पारतंत्र्यात गुलामीत होते. चिमूरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चिमूर वासियांना भजनाच्या माध्यमातून मंत्र दिला कि “झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सबही बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे” या क्रांतिकारी भजनाने चिमूर ची जनता पेटून उठली. यावेळी काही अधिकारी मरण पावले. तर उरलेल्या शिपायांना शहरातील लोखंडी पुला पर्यंत आणून पिटाळून लावण्यात आले. यामध्ये यानंतर 16, 17 आणि 18 ऑगस्ट या तिन्ही दिवशी इंग्रज सरकारचा चिमूर येथे कुठलाही मागमूस नव्हता. चिमूर हे स्वतंत्र झाले याची घोषणा खुद्द सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीच्या बर्लिन रेडिओ स्टेशन वरून केली. यानंतर केंद्र सरकारने येथे लष्कर पाठवून हे आंदोलन मोडून काढले. मात्र, चिमूर हे देशातील पहिले असे ठिकाण आहे. जे देशाच्या पूर्वी काही दिवस का होईना स्वतंत्र झाले. यावेळी चिमूरवासियांना बलिदानाची आहुती दयावी लागली. याच अमर शहीदांना दरवर्षी विनम्र श्रद्धांजली अर्पण केले जाते.

वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिमूरच्या या पुण्यभुमीत सर्वांच्या साक्षीने स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यास व त्यांच्या कुटूंब प्रमुखांचा भावपुर्ण सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी चिमूर क्रांती भूमीत येणार आहेत .

देशभक्तीपर सुगम संगीताचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता तसेच सायंकाळी 5 वाजता अमर शहीदांना विनम्र अभिवादन ( हुतात्मा स्मारक, अभ्यंकर मैदान ) केले जाणार आहे. नंतर स्वातंत्रत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटूंब प्रमुखांचा सत्कार कार्यक्रम, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिवस कार्यक्रम बि. पि. एड. कॉलेज मैदान पिंपळनेरी रोड, चिमूर येथील परिसरात केले जाणार आहे.

*कार्यक्रमाला या पाहुण्यांची राहणार उपस्थिती*
चंद्रशेखरजी बावणकुळे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य, ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री, सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा, ना. गिरीषजी महाजन मंत्री, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन महाराष्ट्र राज्य, हंसराजजी अहिर अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गिय आयोग (केंद्रीय कॅबीनेट मंत्री दर्जा) पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार,माजी आमदार मितेशजी भांगडिया ईत्यादी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशोकजी नेते माजी खासदार, कृष्णाजी गजभे आमदार, किशोर जोरगेवार आमदार संजय धोटे माजी आमदार,अतुल देशकर माजी आमदार, हरीष शर्मा जिल्हाध्यक्ष, भाजपा चंद्रपूर, लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी, प्रकाश वाघ महाराज माजी सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी इत्यादी मान्यवर मंचावर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.
शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here