Home महाराष्ट्र शिक्षणमहर्षी डॉ. आण्णासाहेब डांगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

शिक्षणमहर्षी डॉ. आण्णासाहेब डांगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

160

 

आष्टा – लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे आयोजित जीवनगौरव सन्मान कृषीभूषण समाजभूषण आणि साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात हे तिसरे वर्ष आहे
लोकशिक्षक बाबा भारती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व सोनचाफा वृक्षाला जल अर्पण करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे थोर समाज सुधारक ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस कवी राजेंद्र वाघ सुदाम भोरे शहाजी पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटक म्हणून हे सर्व मान्यवर उपस्थित होते
पहिल्या सत्रामध्ये प्रबोधनपर कवितांची मैफिल सादर झाली या कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर दाभाडे व प्रमुख पाहुणे जयवंत भोसले गायक राम सर्वगोड हे उपस्थित होते कविसंमेलनात जयश्री श्रीखंडे मानसी चिटणीस शाहीर प्रभाकर वाघोले हभ.प.एकनाथ महाराज उगले मुख्य आयोजक पुरूषोत्तम सदाफुले बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती हे हजर होते शाहिरी पोवाडे गीत गझल भावगीते मुक्तछंद अभंग गवळण सादरीकरण करण्यात आले असून या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले
दुसऱ्या सत्राचे प्रास्तविक ए.के . पाटील यांनी केले शिक्षणमहर्षी माजी ग्रामविकास मंत्री डॉ आण्णासाहेब डांगे यांना बाबा भारती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना पद्मश्री गिरीश प्रभुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप श्रीफळ पुष्पगुच्छ पुष्पहार संत तुकाराम पगडी शेला मानपत्र स्मृतिचिन्ह असे होते.
तसेच समाजसेवक शहाजी पाटील यांना यांना बाबा भारती समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले कृषी रत्न उघोगपती सुदामा भोरे यांना बाबा भारती कृषीभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवर असणारे कवी राजेंद्र वाघ व ह.भ.प. एकनाथ महाराज उगले यांना बाबा भारती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कवी राजेंद्र वाघ पुरस्कार विषयी मनोगत व्यक्त करताना म्हणाले
जय हरी जय जय जय हरी
माझ्या विठोबाचा गजर घरोघरी
पहाडी आवाजात कविता सादरीकरण केले अन् सभागृहातील वातावरण प्रफुल्लित अन् रसिक मायबाप मंत्रमुग्ध झाले.तसेच समाजसेवक शहाजी पाटील हे म्हणाले माझ्या आयुष्यातील मोठा क्षण आहे पुरस्कार देवून माझी समाजसेवेची उंची वाढविली इस्लामपूरकरांची मान उंचावली बाबा भारती प्रतिष्ठानचे धन्यवाद मानतो.कृषीरत्न सुदाम भोरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले विडा खायचा नसतो तर तो उचलायचा असतो शेतकरी देशाचा कणा आहे शेतकरी देशाचे भवितव्य आहे आधुनिक शेती केली तरच आपली प्रगती होईल शेतकरी कविसंमेलन घेतले जाते ही बाब अभिमानाची आहे शेती आणि माती सांभाळली तर इच्छा शक्ती वाढते साथ द्या
शिक्षण महर्षी डॉ आण्णासाहेब डांगे म्हणाले बाबा भारती यांची माझी मैत्री अवघ्या दहा वीस दिवसांत झाली तो दैवयोग होता.एक जुनी आठवण सांगताना म्हणतात डॉ दिवाण जात धर्म पंथ न मानणारे होते सत्यनारायण पुजेसाठी बाबा भारती अन् मला निमंत्रित केले
पालि मराठी शब्दकोश निर्मिती करणारे बाबा भारती यांचे पुस्तक मी आणि रा.सु.गवई यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्याकडून प्रकाशित करून घेतले स्नेह वाढत गेला घट्ट मैत्री झाली महेंद्र भारतीचे धन्यवाद मानतो कारण मला जीवनगौरव पुरस्कार देण्याची कशी सुबुद्धी आली असे प्रतिपादन केले.
माणदेशभूमी सुपुत्र वैजनाथ धोंगडे म्हणाले दुःखा पेक्षा जास्त प्रमाणात प्रेरणा मिळतात तत्वाशी मी कधी तडजोड केली नाही नद्या शेवटच्या घटका मोजतात पायी प्रवास करून अभ्यास केला माण नदीतील गाळ काढून नद्या पुन्हा जिवंत झाल्या क्रांतीदिन क्रांतीकारक दिनाच्या पूर्वसंध्येला मला अंधारातून प्रकाशात आणले ते पुरूषोत्तम सदाफुले यांनी मी संस्थेचे महेंद्र भारती यांचे मनापासून आभार मानतो.
थोर विचारवंत श्रीपाल सबनीस आर्त प्रार्थना करणारे क्रांतीकारक भूमीला मी वंदन करतो संवाद पर्वाच जागर करणारे यांस मी विनम्र प्रणाम करतो शिक्षणमहर्षी प्रबोधनकार विद्वान माणूस आण्णासाहेब डांगे नवा मंत्र नवे तंत्र जपणारे सुदाम भोरे विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले कवी राजेंद्र वाघ मंत्र मुग्ध करणारी मेजवानी दुवा जोडणारे प्रा दिगंबर ढोकले पारधी समाजाचे अश्रू पुसणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे पानसुपारी देवून संस्कृती वारसा जपणारे आण्णासाहेब डांगे गुरूजींला कुठे जात असते ज्याला जातीची वजाबाकी येते तोच खरा माणूस सध्या देशात विष पेरणी चालू आहे पण अमृताच्या पेरणीला जास्त महत्त्व आहे देशात आजरकता निर्माण झालेली दिसते आण्णासाहेब गांधीवादी साधा माणूस देवासारखा वाटला धम्मपद लिहिणारे बाबा भारती महापुरुषांचीबेरीज करून जगणारा माणूस होता संत महापुरुष स्विकारले पाहिजे अन् बेरीज करण्याचे महत्त्वाचे वाटते एकसंघ महाराष्ट्र झाला पाहिजे ज्यांनी एक संघ विचारांचा मिलाप केलाय ती संस्था बाबा भारती प्रतिष्ठानची प्रबोधन यात्रा महाराष्ट्रभर होवो.असे प्रतिपादन डॉ सबनीस यांनी केले
बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले माझ्या वडिलांचा विचारांचा वारसा साहित्यिकाचा आरसा यांच्या ऋणानुबंधात राहू इच्छितो असे पुरस्काराचे सोहळे गावोगावी करणार आहोत असा आशावाद व्यक्त केला
अध्यक्षिय भाषणात पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले बाबा भारतीचे कार्य तोलामोलाचे आहे
चिखलाचे रान तुडवत येणारा पहिला मंत्री आण्णांनी त्याकाळी अमूल्य वेळ दिला समाजासाठी इटणारे समाजाला बरोबर घेवून जाणारे स्वाभिमान वाटावा असा आधुनिक माणूस आण्णांच्या पाऊलावर पाऊल टाकले पाहिजे नवीन पिढीनी आदर्श घ्यावा असे जाहीर आवाहन केले
अशा या सुंदर भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे बहारदार दमदार आवाजात सूत्रसंचालन करणारे संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा दिगंबर ढोकले यांनी केले व आभार मानले
आष्टा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थाचे आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here