गडचिरोली : खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची दिल्ली इथे भेट घेतली. त्यावेळी सोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे सुद्धा उपस्थित होते.
या भेटीदरम्यान खासदार डॉ. किरसान यांनी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील टॉवरच्या संख्येत वाढ करावी व 3G टावर चे 4G मध्ये रूपांतरन करावे अशी मागणी केली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही टावर नसल्याने बऱ्याच विद्यार्थी आणि नागरिकांना विविध योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण होत आहे. आज चे युग हे अर्ध्यापेक्षा जास्त नेटवर्क च्या माध्यमातून आपल्याला अभ्यासता येते मात्र गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने अनेक नागरिक यापासून दूर आहे. म्हणून संपूर्ण जिल्हात लवकरात लवकर नेटवर्क चे जाळे निर्माण व्हावे अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केली असता मंत्री महोदयांनी त्या मागणीस पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यात केंद्र सरकार कडून आलेल्या निधीतून 222 नवीन 4G टॉवर स्थापनेचे काम सुरू आहे मात्र काम अतिशय शितलतेने सरू असून त्या कामालां अधिक गतीने करावे व जिल्ह्यात असलेल्या 3G टॉवर ला तात्काळ 4G ची मध्ये कन्व्हर्ट करण्यात यावे
जिल्ह्यातील अनेक टॉवर हे महाराष्ट्र सरकारने टाकलेल्या महाआयटी कंपनीच्या ऑप्टिकल फायबर केबल वर चालतात, सदर केबल मध्ये अनेक दोष असल्याने साइट ह्या वारंवार बंद पडतात, सदर साइट वर BSNL ने स्वताचा केबल टाकावा जेणेकरून केबलमुळे वारंवार साईट बंद होणार नाही,गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी साईट वर बॅटरी बॅकअप नाही, MSEDCL ची लाईट गेल्या बरोबर कव्हरेज जातो , सदर साईट वरील बॅटरी सेट हे जुने झालेले आहेत, तात्काळ नवीन बॅटरी सेट द्यावे त्यामुळे सेवा खंडित होणार नाही, गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्याने येथे कर्मचारी काम करण्यास इच्छुक नसतात, पूर्वी या जिल्ह्यात 2 वर्ष काम केल्यास अधिकाऱ्यांना त्यांच्या ऐच्छिक ठिकाणी पोस्टिंग मिळत असे पण सदर सुविधा ही मागील 2 वर्षांपासून काढून घेतल्याने कुणीही अधिकारी हे बाहेर जिल्ह्यातून येऊन या जिल्ह्यात नोकरी करण्यास इच्छुक नाही, सदर सुविधा ही पूर्ववत करण्यात यावी जेने करून सर्व कर्मचारी स्वखुशीने जिल्ह्यात काम करायला तयार होतील. या सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्याची विनंती खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली.