शांताराम दुनबळे, नाशिक प्रतिनिधी
नाशिक -: इगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विदयमान आमदार हिरामन खोसकर यांची उमेदवारी अखेर कांग्रेस पक्षाने कापली आहे. यामुळें आता कांग्रेस कडुन इच्छुक असणार्या गोपाळा लहांगे व लकी जाधव या उमेदवाराच्यां आशा पल्लवीत झाल्या आहेत. दोन्ही उमेदवारानीं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे.
आमदार हिरामन खोसकर हे शेवट पर्यंत काहितरी चमत्कार करतील व पुन्हा उमेदवारी खेचुन आणतील अशी त्यांचे समर्थकानां आशा होती.ईगतपुरी तालुका कांग्रेस मधील काही पदाधिकार्यानीं बैठक घेऊन तसा ठराव ही केला होता. पण सगळे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले आहे.
दरम्यान विदयमान आमदार हिरामन खोसकर हे स्पर्धेतुन बाद झाल्याने ईगतपुरी पंचायत समिती चे माजी सभापती गोपाळा लहांगे यांच्या नावाने जोर धरला आहे.त्याच बरोबर लकी जाधव यांचेही नाव चर्चेत आहे.
लहांगे हे कांग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात आहेत.ईगतपुरी तालुक्यातील श्रीमंत गणल्या जाणार्या वाडिवर्हे सारख्या औदयोगिक वसाहतीच्या ग्रामपालिकेचे त्यांनी समर्थपणे नेतृत्व केलेले आहे. सलग दहा वर्ष सरपंच, ईगतपुरी पंचायत समिती चे सभापती, जिल्हा नियोजन मंडळ शासकिय समिती आदिवर लहांगे यांनी प्रभावीपणे काम केलेले आहे. तसेच पक्षातही त्यांनी अनु. जमाती सेल सह जिल्हा सरचिटणीस पदापर्यंत काम केलेले आहे.
लहांगे हे मतदार संघातील स्थानिक असल्याचा दावा केला जात असुन ते मतदारसंघात सर्वपरिचित आहेत. शिवाय ते पक्षाचे निष्ठावंत मानले जात आहे.
लहांगे यांनी विधानसभा निवडणूक पुर्व भेठी गाठीनांही प्रारंभ केला असुन मतदारसंघातुन त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला जातो आहे. या शिवाय लकी जाधव यांचेही नाव चर्चेत आहे.