Home महाराष्ट्र साने गुरुजींच्या साहित्याने मानवी मनाची काळजी घेतली तसे क्रांतीगीताने माणसं पेटवली:पगार-शेजवळ यांचे...

साने गुरुजींच्या साहित्याने मानवी मनाची काळजी घेतली तसे क्रांतीगीताने माणसं पेटवली:पगार-शेजवळ यांचे प्रतिपादन

137

 

 

शांताराम दुनबळे, नाशिक प्रतिनिधी

 

नाशिक -: महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सेवा दल डिसेंबर महिन्यात भव्य जयंती उत्सव साजरा करत असून महाराष्ट्रभर राष्ट्र सेवा दलाच्या वतीने साने गुरुजींच्या विचारांचा प्रचार प्रसार त्यांच्या साहित्यकृती गीते व वर्तमानातील सामाजिक भान विद्यार्थ्यांनमध्ये संस्कारीत करण्यासाठी येवला तालुका राष्ट्रसेवा दलाच्या वतीने तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांमधून साने गुरुजींच्या साहित्य गीते व विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी समता प्रतिष्ठान येवला व साने गुरुजी कथामाला राष्ट्रसेवा दलाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

तालुक्यात साने गुरुजी विचार प्रचार प्रसार कार्याचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे त्याचे औचित्य साधून भुलेगाव तालुका येवला येथील अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक संस्थेच्या भुलेश्वर माध्यमिक विद्यालय भुलेगाव येथे आयोजित साने गुरुजी विचार कार्य व तालुका स्तरावरील पथनाट्य स्पर्धेची माहिती देण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे सैनिक हिरामण पगार सर व येवला तालुका राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष शरद शेजवळ सर यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या विचार व गीतांबद्दल उदबोधित केले.

ह्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ मुंडे, कैलास सोनवणे, पंडित देवरे व शिक्षकेतर कर्मचारी बाळू मोरे मामा उपस्थित होते.

श्यामची आई ह्या पुस्तकातील विविध प्रसंग यावेळी हिरामण पगार सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली तर शेजवळ सर यांनी राष्ट्र सेवा दलाचे स्थापना कार्य व गरज सांगत साने गुरुजींच्या आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान बलसागर भारत होवो या गीताचे सादरीकरण करून साने गुरुजींच्या कार्याची माहिती करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पंडित देवरे सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामभाऊ उंडे सर होते आभार कैलास सोनवणे सर यांनी मानले.
साक्षी जानराव, राजश्री रोठे, तनुजा रोठे, सृष्टी गायकवाड, तेजस गायकवाड यांसह कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here