धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव – तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना तर्फे तहसिल कार्यालय येथे इ पॉस मशीन परत करत आंदोलन करण्यात आले परंतु नायब तहसीलदार श्री मोरे साहेब यांनी मशीन न घेता निवेदन स्विकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात आले
या प्रसंगी बोलतांना संघटनेचे अरविंदकुमार ओस्तवाल यांनी इ पॉस मशीन यांची अंत्ययात्रा काढून मशीन जमा करण्याबाबत राज्य संघटनेने दिलेल्या आदेशाला आम्ही वळण दिले असून त्याची अंत्ययात्रा न काढण्याचा निर्णय घेतला कारण आमच्या दुकानदार बांधव यांच्या उपजीविकेचे साधन हे e pos मशीन असल्याने त्याची अंत्ययात्रा न काढता फक्त आंदोलन करून निवेदन देण्याचा मार्ग स्विकारला आहे
त्यात पुढील प्रमाणे प्रमुख मागण्या करण्यात आल्या .
१) इंटरनेट सर्वर सेवा व्यवस्थित पुरवून कायम स्वरुपी हे 4G मशीन चालले पाहिजेत
२) शासनाने धान्य दिलंय पण ह्या मशीन आणि सर्वर मुळे वाटप करता येत नाही
३) महागाईच्या इश्टांका नुसार प्रती क्विंटल ३०० रुपये कमिशन मिळाले पाहिजे
४) सगळ्या योजनांचे धान्य व किट आदी एकच थंब ने सोबत निघाले पाहिजे
५) ekyc साठी आम्ही शासनाला मदत करीत आहोत पण सर्वर मुळे ते शक्य होत नाही तसेच प्रतिव्यक्ती ५० रुपये ekyc साठी शासनाने दिले पाहिजे
६) लाभार्थी यांना वेळेच्या आत धान्य दिले गेले पाहिजे या साठी जर सर्वर प्रॉब्लेम असाच असेल तर ऑफ लाईन ची सुविधा विना अट कायम स्वरुपी ठेवण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर मागण्या बाबत श्री अरविंदकुमार ओस्तवाल यांनी संपूर्ण मागण्या विस्तृत समजावून शासन दरबारी आपण आमच्या भावना पोहचवाव्यात असे सांगितले
प्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ नेते श्री प्रभाकर अण्णा पाटील,तसेच श्री अमृत भाऊ पाटील श्री सुधाकर पाटील, झवर काका पाळधी,श्री रवि भाऊ महाजन श्री ए सी पाटील श्री बाबुलाल काका पाटील श्री विनोद गुप्ता,स्वप्निल पाटील धानोरा, स्वरस्वती म ब गट बोरगाव,संजय भालेराव,प्रसन्न पाटील,एस जे पाटील,इच्छामाता म ब गट,एस एल पाटील, डी पी कोळी, लखीचंद पाटील गारखेडे, वि का सोसा कल्याणे, म्हाळसाई म ब गट,आर डी पाटील निमखेडे,स्वामी समर्थ म ब गट उखळवाडी व गोंदेगाव,सितारा म ब गट, संतोष गुप्ता, महेंद्र चौधरी,अरुण देवरे, संजय गुप्ता,राजा परदेशी चेतन पाटील भामर्डी,नंदलाल पाटील तर्डे,सावित्रीबाई म ब गट निशाणे,डी एस नन्नवरे,पी टी देवरे, मनूदेवी म ब गट आदी असंख्य दुकानदार व ग्राहक उपस्थित होते