Home अमरावती संत्रा फळगतीमुळे हवालदिल झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या — आमदार देवेंद्र...

संत्रा फळगतीमुळे हवालदिल झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या — आमदार देवेंद्र भुयार जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत शेतीसह विविध प्रश्नांवर आमदार देवेंद्र भुयार आक्रमक !

308

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अमाप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देऊन त्यांना हातभार द्या अशी आग्रही मागणी आ. देवेंद्र भुयार यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघातील आरोग्य सुविधा, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, शेती, विद्युत पुरवठा, रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, सिंचन प्रकल्प पर्यटन विकासासह आदी सर्व अति महत्वाचे प्रश्न मांडले. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा बागेतील होत असलेल्या आंबिया बहार संत्राची गळतीमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळगळ व संत्रावरिल विवीध रोगांना नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी ड्रिंचींग करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत बुरशीनाशके व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाला निधी उपलब्ध करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती येथे नवीन लॅब मंजूर करण्यात यावी त्या लॅबला एमआयडीसी अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून निधी उपलब्ध करावा, एप्रिल मे जून २०२४ मध्ये अवकाळी पाऊस गारपीट मुळे संत्रा फळबाग व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई तत्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे व शासनाच्या विविध योजनेचे अनुदान बँकेने त्वरित शेतकऱ्यांना अदा करावे व बँकेने होल्ड केलेले खाते त्वरित रिलीज करावे व बँकेचे खाते होल्ड करणाऱ्या बँक मॅनेजरवर त्वरित कार्यवाही करावी, महानुभाव पंथीयांची काशी व श्री गोविंद प्रभूच्या स्थानाला जागतिक तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून अ तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा व तीर्थक्षेत्र निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, शेकदरी सिंचन प्रकल्प पंढरी सिंचन प्रकल्प अप्पर वर्धा सिंचन प्रकल्प येथे जलक्रीडा पर्यटन निर्माण करण्यासाठी ब दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हा नियोजन ने मान्यता देऊन ब दर्जाचा प्रस्ताव तात्कर सादर करावा, वरुड तालुक्यातील संत खोलटे महाराज घोराड , दादाजी दरबार लोणी तसेच वरूड मोर्शी तालुक्यातील १२ तीर्थक्षेत्रांना जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ब तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात यावा यासह आदी मुद्दे मांडून मतदार संघातील विकास कामे समाविष्ट करण्याची मागणी करून मतदार संघातील विकास कामासाठी निधी देण्यात यावा अशा विविध लोकोपयोगी मागण्या करून त्यांच्या पूर्ततेसाठी आ. देवेंद्र भुयार यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आग्रह धरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here