Home चंद्रपूर नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ‘अधिकारी...

नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ‘अधिकारी आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पी.एस.आय.दिपाली मिसार यांचा सत्कार व मार्गदर्शन

300

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी : स्थानिक नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे ‘अधिकारी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नुकतेच पी.एस.आय. पदी निवड झालेल्या दिपाली मिसार यांचा सत्कार व मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य के. एम. नाईक हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक ए.डब्लू.नाकाडे, एस.यू.मराठे आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून पी.एस.आय. दिपाली मिसार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी.एस.आय. दिपाली मिसार यांचा शाल, श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर
पी.एस.आय. दिपाली मिसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना,” कोविड काळ हा माझ्यासाठी वरदान ठरला असून मी 2020 पासून सातत्याने नियोजनबद्ध अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात अर्ध्या गुणांनी अपयश आल्यानंतर पुन्हा जिद्दीने अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त करतांना राज्यात मुलींमध्ये चौदावी आली. विद्यार्थांनी यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे व प्रसंगी अपयश आल्यास ‘हार के आगे जीत है’ हे नेहमी लक्षात ठेवावे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लास लावण्याची गरज नाही,तर गुरुजनांचे मार्गदर्शन, ग्रंथालय व वाचनालयाची सवय,कठोर मेहनत,अभ्यासाचे वेळापत्रक आणि स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यासात सातत्य ठेवणे या बाबी आवश्यक आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा प्रशासकीय अधिकारी बनू शकतो” असे प्रतिपादन केले. पुढे त्यांनी ‘ग्रामीण भागातील विद्यार्थिनी ते स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थीनी’ हा प्रवास सांगतांना, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे परीक्षेचे व मूल्यमापनाचे स्वरूप, मुलाखतीची तयारी,संदर्भग्रंथ,शारीरिक चाचणीची तयारी इ.बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.यू.मराठे यांनी करतांना, पी.एस.आय. दिपाली मिसार यांचा उपस्थितांना परिचय करून दिला व दिपाली यांचे पूर्ण शिक्षण आपल्या एन.बी.एच.शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी येथे झाले असून त्यांचे यश हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे मत व्यक्त केले.

प्राचार्य के.एम.नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात,” अधिकारी आपल्या दारी या उपक्रमाचे महत्व सांगतांना पी.एस.आय. दिपाली मिसार यांच्या यशस्वीतेचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी दिपाली यांचेसारख्या अधिकाऱ्यांपासून प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व त्यांच्या पाऊलवार पाऊल टाकून स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करित प्रशासकीय अधिकारी व्हावे व विद्यालयाचे नाव उज्वल करावे” असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मेश्राम यांनी, तर अतिथींचे आभार डॉ. पंकज बेंदेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल कानझोडे, अनुराग देशमुख, राहुल गावतुरे, प्रफुल वद्देलवार तथा सर्व शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here