Home गडचिरोली गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील इंटरनेट मुळे उद्भवनाऱ्या समस्याबाबत  खासदार डॉ. किरसान यांनी...

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील इंटरनेट मुळे उद्भवनाऱ्या समस्याबाबत  खासदार डॉ. किरसान यांनी उपस्थित केला संसदेत प्रश्न ; समस्यांचे निराकरण करण्याची केली मागणी ऑफलाईन पद्धतीने राशन वितरण करण्याचीही केली मागणी

294

 

गडचिरोली :: मोदी सरकार डिजिटल इंडिया चा नारा देत, प्रत्येक योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्यापही नेटवर्क चे जाळे पोहचू शकले नाही. इंटरनेट च्या शोधात  नागरिकांना कोसो दूर जावा लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत लोकांना राशन वाटप करण्यात येते, त्यासाठी लोकांच्या बोटांचे अंगठे स्कॅन केल्या जाते त्याकरिता सुद्धा इंटरनेट चा वापर होते मात्र विस्कळीत झालेल्या इंटरनेट च्या सुविधेमुळे राशनदुकानदार राशन वाटप करू शकत नसल्याने, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि राशन दुकानदारांना सुद्धा बसत आहे व अनेक नागरिक राशन घेण्यापासून वंचित राहत असल्याने ऑफलाईन पद्धतीने राशन वितरीत करण्याची मुभा देण्यात यावी. नेटवर्क च्या समस्यामुळे  रुग्णांना वेळीच सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने 18 किमी खाटेवर बसवून दवाखान्यात न्यावे लागत आहे अस्या बऱ्याच समस्या इंटरनेट च्या अभावामुळे होत असून गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात इंटरनेट चे जाळे प्रथम प्रधान्याने मजबूत करण्याची मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या माध्यमातून दुरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या कडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here