सुनील शिरपुरे/विशेष प्रतिनिधी
दर्यापूर:पिंपळोद जि.प.मुलींची प्राथमिक शाळेच्या परिसरात कच-याचे ढिगारे असून येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. एक पाऊल स्वच्छतेकडे हे नारे लावण्यापेक्षा प्रत्यक्षात या गंभीर घाणीच्या साम्राज्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही आणि दखलसुद्धा घ्यायला तयार नाहीत. पहिली ते चौथी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दिवसभर राहावे लागते. पण दिवसभर विद्यार्थ्यांना उघरट घाणेरडा वास सहन करावा लागतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता शाळा परिसरातील कचरा उचलून शाळेचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या शाळेच्या सुरक्षा भिंतीला लागून कच-याचे मोठे ढिगारे असून त्यावर कुत्रे व अन्य जनावरे फिरकतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता या गंभीर समस्यांकडे शासन प्रशासनाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. परिणामी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन परिसरातील कचरा उचलून स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांसह कला फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली आहे..!