Home महाराष्ट्र सर्वांनीच सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश सोहळे करावेत – सत्यशोधक ढोक फुले एज्युकेशन...

सर्वांनीच सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश सोहळे करावेत – सत्यशोधक ढोक फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक पद्धतीने नववा वास्तुशांती सोहळा संपन्न.

328

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)* *मोबा. 9075686100*

 

म्हसवड :- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने फुरसुंगी परिसरात प्रथमच अॅड.स्वप्नील गिरमे यांच्या स्वप्नपूर्ती बंगल्याची सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश व वास्तुशांती सोहळा समारंभ दि. २७ जुलै २०२४ रोजी सायं .6 वाजता मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी विधीकर्ते म्हणून महात्मा फुले चरित्र , साहित्य, साधने व प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सद्श्य व फुले एज्युकेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत प्रबोधन करीत कार्य पार पडले.
या प्रसंगी अॅड.स्वप्नील आणि इंजि.शामल गिरमे यांचे शुभहस्ते थोरसमाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला व आई वडिलांचे हस्ते स्वप्नपूर्ती बंगल्याच्या दरवाजाला मोठा पुष्पहार घालण्यात आला. तसेच सासू सासरे सौ.स्मिता व शामकांत भिंगारे यांचे हस्ते गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.आणि आलेल्या सर्वच मान्यवरांनी राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय याची पूजन केले. यावेळी स्वप्निल व शामल यांनी आई-वडिलांची, समाजाची व देशाची सेवा करीत योग्य मार्गाने धन प्राप्त करून नावलौकिक मिळवेल अशी शपथ घेतली.
यावेळी प्रतिपादन करताना ढोक म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज व इतर संत , महापुरुषांनी मोठे कार्य केले परंतु कोठेही वैदिक पद्धतीने सोहळे संपन्न केल्याचे अस्तित्वात नाही. पेशवाई लयास गेल्यानंतर भटजींनी आपल्या पोटापाण्यासाठी सर्व बहुजनांना धार्मिक गुलाम करीत अंधश्रद्धा कर्मकांड याला खतपाणी घालत बहुजनांची आर्थिक शोषण केले आहे.म्हणूनच या आधुनिक काळात वास्तव परिस्थिती पाहता बहुजनांनी नव्हे तर सर्वांनीच आपल्या घरातील सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने पार पाडावेत यामुळे आपले आर्थिक नुकसान न होता कर्मकांड ,अंधश्रध्दा याला मूठमाती देत असल्याने देशसेवा केल्याचा वेगळाच आनंद मिळेल असे देखील ढोक म्हणाले.
सोहळ्याची सांगता भारताचे संविधान व समता गीतांनी तसेच बुद्ध वंदनानी केली.त्यानंतर सर्वांना पान सुपारी , सह परिवार भोजन दिले आणि स्वप्नपूर्ती बंगला बांधताना ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा पुष्पगुच्छ ,शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या शुभहस्ते गिरमे परिवाराला फुले एज्युकेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे हा सोळा यशस्वी पार पाडला म्हणून सन्मानपत्र व थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट देत सन्मान केला. पाहुण्याचे स्वागत शोभा गिरमे व मनोगतात स्वप्निल गिरमे,स्मिता भिंगारे,मधुरा सोनवणे यांनी सर्वांनीच सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश केले पाहिजे असे म्हंटले तर शेवटी इंजि.प्रियांका गिरमे हिने आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here