Home महाराष्ट्र म्हसवड येथे घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास ; एका महिन्यात तिसरी चोरीची घटना...

म्हसवड येथे घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास ; एका महिन्यात तिसरी चोरीची घटना नागरिकांत भीतीचे वातावरण

376

म्हसवड : म्हसवड, ता.माण, जि. सातारा येथील दत्तनगर भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी तीन लाख रुपयास दहा तोळ्याच्या आसपास सोन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली
याबाबतची तक्रार यशोधन दिलीप माने यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिली या तक्रारीत त्यांनी 26 जुलै रोजी मध्यरात्री चे सुमारास दत्तनगर म्हसवड येथील माझे राहते घराचे आतून बंद असलेले घराचा लाकडी दरवाजाची कडी फटीतून लहान काठी आता घालून कडी काढून अनधिकृत घरात घरात प्रवेश केला व घरातील तीन लोखण्डी कपाटातील लॉकर त्यांचेकडील चावीने व इतर हत्याराणे उघडून आमच्या मालकीचे रोख रक्कम व साधारण तीन लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज घरफोडी चोरी करून नेहल्याची तक्रार अज्ञात चोरट्यानविरोधात दिल्याची माहिती दिली
याठीकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे दहिवडी कॅम्प वडूज यांनी भेट देऊन स्थळाची पाहणी केली व तपासाच्या योग्य त्या सूचना केल्या या गुन्ह्याचा तपास सपोनि सखाराम बिराजदार करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here