Home चंद्रपूर जिल्हाधिकारी यांची गोबर्धन प्रकल्पाला भेट-गोबर्धन प्रकल्प त्वरित कार्यान्वित करा

जिल्हाधिकारी यांची गोबर्धन प्रकल्पाला भेट-गोबर्धन प्रकल्प त्वरित कार्यान्वित करा

140

चंद्रपूर (प्रतिनिधी ) – मुल तालुक्यातील मारोडा या गावात गोबर्धन प्रकल्प चे काम चालू असून, काम आता पूर्णत्वास येत आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकतीच प्रकल्पाला भेट दिली असून, प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. प्रकल्पाची उर्वरित कामे त्वरित पुर्ण करुन, गोबर्धन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हास्तरीय गोबर्धन प्रकल्पाकरिता मुल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतची निवड करण्यात आलेली आहे. या गोबर्धन प्रकल्पामध्ये ओला कचरा व गुरेढोराचे शेणा पासून गॅस व खत निर्मिती करण्यात येणार आहे .सदर गॅस पासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे व निर्माण झालेली वीज विद्युत महामंडळाच्या ग्रिटला पुरविण्यात येईल .याद्वारे शासकीय कार्यालय सार्वजनिक लाईट यांचे विजेचे बिलात बचत होणार आहे . प्रकल्पातून निघणारे खत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना व बाजारपेठेत विकून त्यातून आलेले उत्पन्न हे प्रकल्प चालविण्याकरिता वापरण्यात येणार आहे.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी पूर्णतः गोबर्धन प्रकल्पाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली. प्रकल्पाला निरंतर लागणारे गुराढोरांचे शेण व ओला कचरा लोकसहभागातून गोळा करा. गोवर्धन प्रकल्पाचे उर्वरित कामे त्वरित पूर्ण करा. असे निर्देश यावेळी यंत्रणेतील अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)नूतन सावंत, तालुका कृषी अधिकारी, मुल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मारोडा ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक व गावातील गणमान्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here