Home लेख सीआरपीएफ स्थापना: इतिहास आणि महत्त्व! (भारताचे केंद्रीय राखीव पोलीस दल- सीआरपीएफ...

सीआरपीएफ स्थापना: इतिहास आणि महत्त्व! (भारताचे केंद्रीय राखीव पोलीस दल- सीआरपीएफ स्थापना दिन.)

98

 

_केंद्रीय राखीव पोलीस दल- सीआरपीएफ हे भारतीय पोलीस संस्थेचे एक घटक आहे. हे संघटन भारत सरकारच्या गृहमंत्रालयच्या आदेशानुसार काम करते. यामध्ये काही महत्वाचे कार्य म्हणजे दंगलीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे, काऊंटर मिलिटरी, बंडखोरी, ऑपरेशन, जमाव नियंत्रण, वामपंथी अतिरेक्यांना सामोरे जाणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव आणि मदत कार्य करणे, यास्तव केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना दि.२७ जुलै १९३९ला करण्यात आली. ज्ञानवर्धक माहितीकरिता श्रीकृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदरलेख अभ्यासा… संपादक._

केंद्रीय राखीव पोलीस दल- सेंट्रल रिझर्व्ह पुलिस फोर्स- सीआरपीएफ हे भारतातील सुरक्षा दलांपैकी एक सर्वांत मोठे केंद्रीय दल आहे आणि भारतीय पोलीस सेवेतील हे फोर्स एक बहुउद्देशीय असून अनेक क्षेत्रांतील सुरक्षा करते. सीआरपीएफ भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या (एमएचए) अधिकारात कार्यरत आहे, सीआरपीएफची स्थापना २७ जुलै १९३९ साली झाली आणि यांचा उद्देश अनेक सुरक्षेच्या कार्यात आंतरिक सुरक्षा प्रदान करणे, सीमावर्ती सुरक्षा आणि आणीबाणीच्या परिस्थितीत सुरक्षा, मदत देणे हा होता तसेच सीआरपीएफ विभिन्न क्षेत्रात तैनात करण्यात आली आहे जसे जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगढ, प्रभावित क्षेत्र तसेच इतर भारत देशातील राज्यांत देखील ही सुरक्षा देण्यात आली आहे. सीआरपीएफचे बोधवाक्य “सेवा आणि निष्ठा” आहे, भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर दि.२ डिसेंबर १९४९ला कायदा लागू करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल- सीआरपीएफ बनले आणि निवडणूक काळात देखील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षेचे कार्य निभावले.
भारत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीआरपीएफचे महत्व मोठे आहे, हे फोर्स एक विशेष सशस्त्र दल आहे जे विविध भागात सुरक्षा आणि शांतता राखण्यात महत्वाची भूमिका बजावते. सीआरपीएफ हे सीमा सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, व्यावसायिक घटनांचा तपास आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कार्यवाहीसाठी आहे. सन १९९९च्या साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील लाभलेली मोठ्या प्रमाणात सुरक्षितता बघून आपण या फोर्सचे महत्व समजू शकतो. सीआरपीएफच्या एकूण २४६ इतक्या बटालियन आहेत आणि सीआरपीएफ हे भारत देशातील सर्वांत मोठे अर्धसैनिक दल आहे. जर आपण याचा इतिहास बघितला तर मध्य प्रदेश राज्यात निमच मध्ये दोन बटालियनद्वारे स्थापना झालेली होती. सीआरपीएफचा जर आपण इतिहास बघितला तर या फोर्सचा पूर्वीपासूनच मुख्य उद्देश हा होता कि भारत देशातील संवेदनशील राज्यांत असलेले ब्रिटिश रहिवासी यांचे संरक्षण करणे होता. ही पूर्वीपासूनच त्याची प्राथमिकता होती, म्हणून सीआरपीएफ नक्कीच या उद्देशांमुळे संरक्षण अंतर्गत आहे, असे म्हणता येईल. सीआयएसएफ हे एक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आहे आणि हे एक केंद्रीय सशस्त्र दल देखील आहे, जर या फोर्सशी तुलनात्मक विचार केला तर हे सीआयएसएफ औदयोगिक क्षेत्रात- खदानी, विमानतळ, मेट्रो स्टेशन, अणुऊर्जा प्रकल्प आणि इतर महत्वाचे सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांतील सुरक्षा आणि सुविधा देण्याचे काम करते आणि सीआरपीएफचा जर विचार केला तर हे भारत देशातील सर्वांत मोठे केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आहे. या फोर्स कडे- अंतर्गत सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, इतर अंतर्गत कारवाया करणे, आपत्तीच्या ठिकाणी तात्काळ सुरक्षा पुरविणे
इत्यादी. दोन्हीही फोर्स कामानुसार विभाजित झालेले आहेत आणि दोन्हींनी फोर्स आपापल्या जागी स्वतःची वेगळी ओळख देऊन आहेत, म्हणून दोन्हीही फोर्सला आपल्या आवडीनुसार आपण प्राधान्य देऊन त्यांची कामे बघून आवड निवडू शकतो. सीआरपीएफ किंवा बीएसएफ कोणते सर्वोत्तम आहे? तर सीआरपीएफच्या कार्याचा विचार आपण मागे केलाच आहे, तर बीएसएफ- सीमा सुरक्षा दल हे भारत देशातील सीमांचे संरक्षण करणारे दल आहे आणि सीमांना संरक्षण देणे, त्याचे प्राथमिक कर्तव्य आहे तसेच- भारत देशाच्या सीमांचे रक्षण करणे, तस्करी, बेकायदेशीर इमिग्रेशन, इतर सीमापार गुन्ह्यांचा प्रतिकार करणे, युद्धाच्या काळात देशात शांतता राखणे, इत्यादी. फोर्सनुसार कामांचे विभाजन झाले आहेत आणि प्रत्येक फोर्स फक्त आपल्या करत असलेल्या कामामुळे विभाजित आहेत.
सीआरपीएफ- सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि या फोर्सला भारत देशातील अनेक प्रकारच्या सुरक्षा सोपविण्यात आल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक लोकांची सुरक्षा राखणे, एखादा कायदा मंजूर झालेला असल्यास त्याची अंमलबजावणी करणे, सीमावर्ती सुरक्षा देणे, त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा, मदत प्रदान करणे, सुरक्षेच्या ठिकाणी तपासणी करणे, शांतता राखणे, गुन्ह्यांचा तपास करणे, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कार्यवाही करणे, विशेष ऑपेरेशन, आपत्ती निवारण, निवडणुकांमध्ये वाढीव सुरक्षा पुरविणे आणि कार्यक्रमांमध्ये सहायता देणे अशा अनेकविध सरकारी किंवा सामाजिक सुरक्षा, सुविधेचे काम सीआरपीएफ करते.
!! सीआरपीएफ स्थापना दिनानिमित्त संबंधित जवानांचे हार्दिक अभिनंदन जी !!


– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त दूरभाष- ७१३२७९६६८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here