Home महाराष्ट्र अॅड.स्वप्नील गिरमे करणार सत्यशोधक पध्द्तीने वास्तुशांती. फुरसुंगी मध्ये फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक...

अॅड.स्वप्नील गिरमे करणार सत्यशोधक पध्द्तीने वास्तुशांती. फुरसुंगी मध्ये फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक पद्धतीने होणार नववा वास्तुशांती सोहळा

124

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड :- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने अॅड.स्वप्नील गिरमे, रहाणार ,खंडोबा माळ,फुरसुंगी परिसरात प्रथमच आपल्या स्वप्नपूर्ती बंगल्याची सत्यशोधक पद्धतीने वास्तुशांती सोहळा समारंभ शनिवार दिनाक २७ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वाजता पार पाडणार आहेत. याप्रसंगी विधीकर्ते म्हणून महात्मा फुले चरित्र ,साहित्य,साधने व प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सद्श्य व फुले एज्युकेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक हे उपस्थीत राहून कार्य सिद्धीस नेणार आहेत. या पूर्वी अॅड.स्वप्नील गिरमे यांनी या संस्थेच्या माध्यमातून सत्यशोधक पध्द्तीने विवाह केला आणि आज बंगल्याची वास्तुपूजा समारंभ देखील सत्यशोधक पध्द्तीने करीत आहेत ही आजच्या आधुनिक काळात महत्वाची गोष्ट ठरत आहे. अॅड.स्वप्नील गिरमे हे पेशाने वकील असल्याने त्यांना वास्तव परिस्थिती,वाचनाची आवड खरे खोटे याचे सखोल ज्ञान आणि संत , महापुर्षांचे कृतीशील कार्य करण्याची आवड आहे. त्यामुळे त्यांनी होमहवन ,मुहुर्थ ,कर्मकांड याला फाटा देत सत्यशोधक कार्याचा प्रसार करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. त्यांना त्यांचे आई सौ.शोभा आणि वडील श्री.मनोज गिरमे हे मोलाची साथ देत आहेत.
या प्रसंगी अॅड.स्वप्नील आणि इंजि.शामल गिरमे यांचे शुभहस्ते थोरसमाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालण्यात येणार आहे.तर आई वडिलांचे हस्ते स्वप्नपूर्ती बंगल्याच्या दरवाजाला मोठा पुष्पहार घालण्यात येणार आहे तर आलेल्या सर्व मान्यवर मंडळींना आपल्या देशाची सविधान उद्देशिका प्रेम भेट देण्यात येणार आहे.तसेच बंगला बांधताना ज्या ज्या मजुरांनी काम केले त्यांचा येथोचित सन्मान देखील यावेळी केला जाणार असल्याचे सौ.शोभा गिरमे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here