Home चंद्रपूर चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची उमेदवारी मिळणारच-धनराज मुंगले यांनी व्यक्त केला आशावाद!

चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची उमेदवारी मिळणारच-धनराज मुंगले यांनी व्यक्त केला आशावाद!

642

 

चिमूर – राज्यात येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांकडून विधानसभा उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसने मला उमेदवारीची संधी दिल्यास चिमूर विधानसभा क्षेत्रात मोठे औद्योगिक, व्यावसायीक उपक्रम राबवून चिमूर विधानसभा क्षेत्रातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देणार असे मत कॉग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेश संघटक धनराज मुगले यांनी चिमूर येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आपल्या व कार्यकर्त्याच्या हस्ते गरजु नागरीकांना छत्री व टि शर्ट वितरण करून सामाजिक उपक्रम राबविले आहे तसेच भिसी नागभीड क्षेत्रातही असे उपक्रम राबविणार जाणार असे त्यांनी या प्रसंगी म्हटले आहे.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ता वामन गेडाम, राजु लोणारे, नागेश चट्टे, रत्नाकर विटाळे, शांताराम शेलवटकर, पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदिप तळवेकर, विलास मोहीनकर, संदिप घोडमारे, दिलीपराव गंधारे, जाबेर कुरेशी, शंकर माहुरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here