धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तालुकास्तरीय शासकिय कॅरम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूल चे क्रीडाशिक्षक एच डी माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सा.दा.कुडे विद्यालयाचे क्रिडा शिक्षक व तालुका समन्वयक एस एल सूर्यवंशी यांनी केले. तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालये यांनी स्पर्धेत भाग घेतला. खेळ हा जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो म्हणून सर्वांनी खिलाडू वृत्तीने जीवन जगले पाहिजे. खेळ खेळल्याने आपल्या शरीर तंदुरुस्त राहते यासोबत बौद्धिक चातुर्य वाढते असे प्रतिपादन सूर्यवंशी यांनी केले. विजयी स्पर्धकांना जिल्हास्तरावर जाण्यासाठी क्रीडा शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी पी आर हायस्कूलचे क्रिडा शिक्षक वाय ए पाटील, डी एच कोळी, लिटील ब्लॉझम स्कूल चे पवन बारी, साळवे येथील विनायक कायंदे, महाविद्यालयाचे जितेंद्र ओस्तवाल व खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रिडा शिक्षक एच डी माळी तर आभार प्रदर्शन जितेंद्र ओस्तवाल यांनी केले तर शाळेतील कर्मचारी जीवन भोई यांनी परिश्रम घेतले.