धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर
धरणगांव – कारगिल विजय दिवसाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांनी संयुक्तपणे धरणगाव महाविद्यालयात दिनांक 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर डॉ. अरुण वळवी यांनी उपस्थित विद्यार्थी स्वयंसेवकांना तात्कालीन युद्धाबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. तसेच हे युद्ध कशा पद्धतीने व कश्या परिस्थितीत लढल्या गेले याबद्दलची माहिती उपस्थित विद्यार्थी स्वयंसेवकांना चित्रफिती द्वारे दाखवण्यात आली. याप्रसंगी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना उपस्थित विद्यार्थ्यां तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजीत जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. पूर्वा कुलकर्णी मॅडम, प्रा. श्रद्धा चौटे मॅडम यांचे सहकार्य लाभले.