✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड – (दि. २६ जुलै) शासनाच्या कल्याणकारी योजनांचे लाभ खऱ्या नागरिकांपर्यंत पोचण्याकरिता नागरिकांना संघटित करून संघर्ष करण्यासाठी मुव्हमेन्ट फॉर पीस अॅन्ड जस्टिस फॉर वेलफेअर ( एमपीजे) ही गैर धार्मिक गैर राजकीय संघटना कार्यरत आहे.
संघटना देशातील नागरिकांना उपासमारी, दारिद्र रेषेतून वर आणणे, गुणवत्तापूर्ण सुविधा पुरविणे संबंधी नागरिकांचे हक्क व अधिकार विषयी जनजागृती करण्याचे काम करित आहे.
संघटनेच्या 2024 ते 2026 या कालावधीकरिता संस्थापक सदस्या द्वारे प्रदेश अध्यक्ष म्हणून मोहम्मद सिराज मुंबई यांची निवड करण्यात आली व राज्य कार्यकारिणी समितीत
अफसर उस्मानी मुंबई, महेमुद
खान जळगाव, अल्ताफ हुसेन नांदेड, अजीम पाशा अंबड, मोहम्मद अनिस मुंबई, शब्बीर देशमुख पुणे, तंझीम अन्सारी भिवंडी, नाजेरा मसरूर कल्याण, गजनफर हक्क विक्रोली यांची ची नुकतीच निवड झाली.
राज्यभरातील लोकल युनिट,
शहराध्यक्ष, व तालुका अध्यक्षाची
निवड प्रक्रिया सध्या सुरु आहे.
याच प्रकियेचा भाग म्हणून
राहत क्लीनिक, नाग चौक येथे निवडणुक प्रक्रीया पार पडली.
यात शहर अध्यक्ष
म्हणून मोहसीन राज, उपाध्यक्ष
म्हणुन गजानन भालेराव , सै सलीम ठेकेदार ,मिनाज अहेमद , मुजाहीद खान , इरफान खान यांची तर सचिव म्हणून सचिव अ. जहीर, सहसचिव सै रजा ट्रेझर म्हणून वसीम रसुल, प्रसिद्धी प्रमुख फिरोज अन्सारी, कोषाध्यक्ष म्हणून सर्फराज अहेमद यांची निवड करण्यात आली.
हाफीज अन्सार यांची उमरखेड
तालुका अध्यक्ष यांची तालुका उपाध्यक्ष डॉ. फारूक अबरार व रुखमाजी मंगय्या तर सचिव जुबेर खान लाला , सह सचिव समिर खान , शफील राज, विस्तार सदस्य तसलीम अहेमद यांची निवड झाली. निवडणुकीची प्रक्रीया संस्थापक सदस्य राहत अन्सारी यांनी पार पाडली.
विशेष म्हणजे एमपीजे ने महाराष्ट्र सरकार च्या 9 फेब्रुवारीच्या शिथिल धोरणाला उच्चन्यायालयात आव्हान देवून आणि संविधानिक युक्तिवाद केला.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारचा वादग्रस्त निर्णय असंवैधानिक आणि घटनेच्या कलम 15 चे उल्लंघन करणारा असल्याचे सांगत आरटीई दुरुस्तीला रद्द केले हे नुकतेच एमपीजे च्या कार्याला आलेले यश होय.