गडचिरोली- विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी जेष्ठ समाजसेवक डॉ.देवाजी तोफा यांची लेखा (मेंढा) येथे भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करत गावामध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली.
यामध्ये महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ अंतर्गत घोषित ग्रामदानी गाव मेंढा (लेखा) चे विनियम, महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६५ कलम ४४ द्वारे प्रदान केलेल्या व या बाबतीत समर्थन करणाऱ्या ईतर सर्व शक्तींचा उपयोग करून ग्रामदान गाव (मेंढा) लेखा चे ग्राम मंडळ राज्य शासनाच्या पुर्वमंजुरीने उक्त अधिनियमाच्या उपबंधांच्या अंमलबजावणीकरीता विविध विनियम केले आहेत. त्या नुसार कायद्याच्या कार्यान्वयेने साठी ग्रामदानी गाव मेंढा (लेखा) तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली या गावच्या ग्राम मंडळाने आपले विनियम बनविले आहेत.
या अधिनियमाच्या अंमलबजावणी शासन स्तरावरून लवकर व्हावी यासाठी शासनाकडून योग्य त्या कार्यवाही साठी त्याची प्रत सादर केले आहेत.
अश्या विविध आदिवासींचे हक्क व अधिकार, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास, पेसा कायदा, बांबु लागवड, बांबु व्यवस्थापन आदी विषयावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संजय गावडे, शुभम किरंगे, अमित करंगामी आदी गावकरी उपस्थित होते.