Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आवाहन

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आवाहन

114

 

सोलापूर, अकलूज : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि भारतीय दलित संसद संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त केले आहे व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या माहितीसह जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व दलित संसद संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या चार खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी आपले प्रस्ताव ३० जुलै,२०२४ पर्यंत
‘बिग बी आय टी पॉईंट’ नवीन एसटी स्टँड समोर, बजाज फायनान्स शेजारी, आयसीआयसी बँकेच्या पाठीमागे, मु. पो. अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी ८६००२७०१९९ / ९४२३५२६२४४ वर संपर्क साधावा असे आवाहन श्री सोमनाथ खंडागळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here