रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
गडचिरोली :: केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा दुजाभाव करणारा अर्थसंकल्प असून ज्या राज्यातील पक्षानी सरकार बनवनियासाठी भाजप ला मदत केली व ज्यांचा आधार घेऊन सरकार अस्तित्वात आहेत त्याच राज्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे, मोठ्या प्रमानात महागाई – बेरोजगारी चे प्रमाण वाढत असताना त्यावर कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. उलट अत्यल्प मानधनात 6 महिन्याची इंटर्नशिप देऊन देशातील लाखो तरुणाची बोडवण करण्यात येणार आहेत. हे अर्थसंकल्प तकलादु असून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व उत्पादन खर्चात घट होईल अश्या कुठल्याही प्रकराची विशेष तरतूद नाही.