Home चंद्रपूर विठ्ठल नाम संकीर्तनात अद्भुत शक्ति आहे-आषाढी पौर्णिमा महोत्सवात मुरलीमनोहर व्यास

विठ्ठल नाम संकीर्तनात अद्भुत शक्ति आहे-आषाढी पौर्णिमा महोत्सवात मुरलीमनोहर व्यास

68

चंद्रपूर – विठ्ठल नामोच्चारणात अद्भुत वैज्ञानिक शक्ति आहे। जेंव्हां आपण विठ्ठल म्हणतो तेंव्हां आपली जिभ टालुला स्पर्श करते आणि आपला स्वास दीर्घ होऊन नाभी आणि हृदया मध्ये स्पंदन होऊ लागते। हे स्पंदन आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते असे संशोधन एक मेडिकल रिसर्च मधे करण्यात आलेले आहे। तरी आपण सर्व मानवांनी भक्तिभावाने सदैव विठ्ठल नाम संकीर्तन करत रहावे। हे नाम स्मरण प्रत्येक जाती धर्मीय मनुष्यां साठी लाभदायक आहे , असे विचार चंद्रपुर चे आध्यात्मिक चिंतक तथा साहित्यकार मुरलीमनोहर व्यास यांनी प्रतिपादित केले।
श्री गोवर्धननाथ हवेली चंद्रपुर येथे आषाढी पौर्णिमेच्या सत्संग प्रसंगी व्यासजी बोलत होते।
व्यासजी म्हणाले , आपल्या ऋषि मुनि , साधु संतांनी प्रभु नाम संकीर्तन करण्याचा आग्रह याच साठी केलेला आहे कि , प्रभु नाम स्मरण करता करता भक्त स्वस्थ रहावे, मस्त रहावे ,चिंता मुक्त रहावे। नाम स्मरण करत राहल्याने मन शांत आणि प्रसन्न राहतो ।
आपल्या अध्यात्मात लोकांना मार्गदर्शन आहे कि, देवाच्या प्रसन्नतेसाठी माता-पिता ची सेवा करावी। माता-पिता ची सेवा करणार्या पंढरी ला दर्शन देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पंढरीच्या घरी आले। पंढरपुरातच वास्तव्य करुन राहत आहेत।विटोबा, विठोबा , विठ्ठल तथा पांडुरंग आदि विविध नावे धारण केली। विठ्ठल आपल्या भक्तांना स्वानुभाव ही करून देतो।
चंद्रपुर शहरातुल विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाच्या साक्षात्काराची फलसृती आहे । चंद्रपूर शहरात एक प्रतिष्ठित श्रीमंत सज्जन श्रीकृष्ण भक्त गोविंदराव खडाखडी राहत होते। त्यांची कामना चंद्रपुरात श्री लक्ष्मीनारायणाचे मंदिर तयार करण्याची होती । इस्वी सन 1750 मधे एके दिवसी त्यांना स्वप्न आले कि , चंद्रपुर शहराच्या पश्चिमी क्षेत्रात प्रवाहित इरई नदी च्या पात्रात एक काला दगड आहे त्याने प्रतिमा निर्माण कर । गोविन्दराव यांनी मुर्ति निर्माण कार्य प्रारंभ करण्यासाठी छिन्नी चा प्रहार करता क्षणी विठ्ठल नाम चा प्रतिध्वनी प्रगट झाला। त्यांनी निर्माण कार्य थांबवुन दिले । त्यांना पुन्हा स्वप्न पडले कि लक्ष्मीनारायण मीच आहे आणि विठ्ठल ही मीच आहे। माझ्या विठ्ठल स्वरुप चे निर्माण करुन स्थापना व्हावी ही माझी इच्छा आहे । गोविंदरावांनी विठ्ठल मंदिराचे निर्माण केले।
चंद्रपूर च्या विठ्ठल मंदिरात आषाढी पौर्णिमेच्या दिवशी रथयात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो।
व्यासजी म्हणाले परमेश्वराच्या स्वरुप , नाव आणी त्यांच्या लीला कार्यांवर दृढ विश्वास ठेऊन भक्ति केली पाहिजे । त्याने जीवनातील अनेक कार्ये सुगमतापूर्वक सफल होऊन जातात । लौकिक आणि पारलौकिक जीवन सुधरून जातात असे आपल्या शास्त्रांचे कथन आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here