Home चंद्रपूर अतिवृष्टीने घराची भिंत कोसळल्यामुळे चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे दिला मदतीचा हात

अतिवृष्टीने घराची भिंत कोसळल्यामुळे चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे दिला मदतीचा हात

274

 

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430

चिमूर : – दिनांक.२३/०७/२०२४ चिमूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने सर्वत्र परीसर हे जलमय झाले असल्याने नेकांच्या घरी पाणी शिरले असता कुणाचे अन्न धान्याचे तर कुणाची घरे पडल्याची चित्र बघायला मिळत आहे.अशातच चिमूर शहरातील नेताजी वार्ड येथील रहिवाशी विमलबाई बंडे यांच्या घराची भिंत अती संततधार पावसामुळे कोसळली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असता माहिती मिळताचक्षणी चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनने सर्व पदाधिकारी तथा सदस्यगन यांना बोलावून विमलबाई यांच्या घराकडे धाव घेत प्रत्यक्षदर्शी पहाणी केली आणि विमलबाई बंडे यांना मदतीचा हात म्हणून आर्थीक मदत दिली. यावेळी गौतम पाटील, अक्षय नागरीकर, रोहन नंन्नावरे, अमित मोदी, विलास मोहिनकर , प्रवीण मोदी ,सुनील हिंगणकर,शार्दूल पचारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here