रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघ गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघात येतो. या मतदार संघात साडेतीन लाख कुणबी मतदार आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघात पन्नास टक्के पेक्षा जास्त कुणबी मतदार आहेत. मराठा आरक्षण, नॉन क्रिमिनल, शिष्यवृत्ती, वस्तिगृह आदि मुद्द्यावर यावेळेस कुणबी लॉबी मोठ्याप्रमाणात सक्रिय दिसत आहे. कुणीबी नाही तर फक्त कुणबी पाहिजे अशी मागणी कुणबी मतदार करीत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून कुणबी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. गडचिरोली- चिमुर मतदार संघात कुणबी समाजासह ओबीसी प्रवर्गातील मतदारांची संख्या मोठी आहे. गडचिरोली- चिमुर मतदार संघात व चंद्रपूर-वणी-आर्णी या मतदारसंघात काँग्रेसजणांना कुणबी मतदारांकडून घवघवीत यश संपादन करता आले. ब्रम्हपुरी विधानसभा आमदार तथा विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने ब्रम्हपुरी येथे विकास कामे झाली असली तरी सध्या स्थितीत जातीला घेऊन राजकारण जास्तच तापत आहे. त्यामुळे आगामी ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षालासुद्धा कुणबी उमेदवाराबाबत विचार करावा लागणार आहे.
_____________________
*आगामी उमेदवारांच्या नावांची चर्चा*
आमदार विजय वडेट्टीवार , भाजपाचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, डॉ. प्रा. राजेश कांबळे ,दिपक उराडे ह्या प्रस्थापित नावांबरोबर कुणबी उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात काँग्रेस पक्षाचे माजी जि. प. सदस्य प्रमोद चीमुरकर, भाजपचे माजी जि. प. उपाध्यक्ष क्रीष्णा सहारे , भाजपाचे प्रा. प्रकाश बगमारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम्रेड विनोद झोडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच रक्तविर सेना सुद्धा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
________________
*कुणबी मतदारांची संख्या येथे मोठी*
चंद्रपूर तालुक्यातील ब्रह्मपुरी, चिमुर, नागभिड, सावली व सिंदेवाही तसेच गडचिरोली जिल्हयातील आरमोरी, देसाईगंज आणि चामोर्शी आदी आठ तालुक्यांत कुणबी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एकूण मतदार संख्येचा विचार केल्यास सदर आठ तालुक्यांत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार संख्या कुणबी मतदारांची आहे.