✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दिनांक २० जुलै) शिवमती सरोज नंदकिशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
“विठ्ठल,विठ्ठल, विठ्ठला विठू नामाची शाळा भरली ज्ञानोबा तुकाराम”..! अशा विठ्ठल नामाच्या गजराने चिमुकल्यांनी परिसर दुमदुमून सोडला.
या दिंडी सोहळ्यात बाल वारकरी विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, जनाबाई अशा विविध पारंपारिक वेशभूषा करून तसेच गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, टिळा, डोक्यावर तुळशी घेऊन ज्ञानोबा – तुकाराम यांच्या गजरात हा पालखी सोहळा मध्ये रिंगन घालून व पाऊले खेळून पूर्ण करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शिवमती सरोज नंदकिशोर देशमुख म्हणाल्या की, संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी.
यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात सण उत्सवांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेल्या पारंपारिक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांना उपक्रमातून सण उत्सवांची माहिती दिली जात असल्याचे सांगितले.
यानंतर प्रांगणात “चिमुकल्यांनी घेतला रिंगणाचा आनंद” विविध वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळ्यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला रिंगण सोहळ्यामध्ये फुगडी घालून विविध पारंपारिक खेळ खेळून अनोख्या पद्धतीने रिंगणोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.