Home यवतमाळ जनूना येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

जनूना येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

121

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद – तालुक्यातील जनूना येथे स्वर्गीय सुभाषदादा राठोड मित्र मंडळ व कोडेश्वर संस्थान जनूना यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरु पौर्णिमेनिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प दीक्षा कार्यक्रमांतर्गत स्व. सुधाकरराव नाईक हायस्कूल व,जि. प. शाळा परिसरात वृक्ष लागवड व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत लोकेशनंद पुरी महाराज.हे होते
तर प्रमुख अतिथी म्हणून बाबूसिंग आङे.माजी जि प सदस्य तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामचरण पवार. आकाश राठोड, ग्रामीण गृह निर्माण अभियंता पं. स. पुसद प्राचार्य ओंकार राठोड मुख्याध्यापक सुरेंद्र विटाळकर. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव नाईक यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आकाश राठोड यांनी वृक्ष लागवड करणे काळाची गरज असून एक व्यक्ती एक झाड प्रत्येकानी लागवड करावी असे आवाहन गावकऱ्यांना करण्यात आले आहे या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here