संतोष कुळमेथे
राजुरा तालुका प्रतिनिधी
जवाहर नवोदय विद्यालय प्रमाणे महाराष्ट्र राज्यात सी.बी.एस.सी. शिक्षण पद्धतीने शिक्षण आदिवासी होतकरू मुलांना मिळावा, यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल ची स्थापना आदिवासी विकास विभाग च्या वतीने करण्यात आली.गेल्या काही वर्षांपासून शाळा उत्कृष्ठ सुरू आहेत व आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी ह्या शाळेत परीक्षा देऊन टक्के वारी नुसार प्रवेश घेतला जातो.
सुरुवातीच्या काळात एक दोन पदे वगळता सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले. त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे पण घेण्यात आले. २०१८ मधील कोवीड सेंटर मनून अश्या बऱ्याच शाळांना दिले.त्यात शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केली. तसेच शाळेत जवळ पास ५ ते ६ वर्ष अल्पश्या पगारात काम करून घेतल्या नंतर ,आता त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या मनसुभा राज्य सरकार चा असून, NEXT या कंपनी च्या वतीने नवीन कर्मचारी घेण्यात येणार असल्याने, राज्यभरातील सर्व कर्मचाऱ्यांना बेरोजगारी च्या मार्गावर शासन नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एवढे वर्ष कमी पगारात काम करून “काम झाल माझे काय करू तुझे” अशी गत राज्यातील सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल मधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांची होणार असल्याचे बोलले जात आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल कर्मचारी ह्यांच्या वतीने ॲड . संतोष कुळमेथे, विदर्भ अध्यक्ष आदिवासी टायगर सेना, ड्रेफुल आत्राम माजी सैनिक जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, इंजी. अभीलाश परचाके, विदर्भ युवा अध्यक्ष, कल्पना सोयाम, रंजना आत्राम, रेखा सलाम, अमोल गेडाम, आदिवासी टायगर सेना यवतमाळ, ह्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल मधील चतुर्य श्रेणी कर्मचारी ह्याच्या वर होणारा अन्याय थांबवून त्यांना कायम स्वरुपी सेवेत सामावून घेण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री,तसेच आदिवासी विकास विभागाच्या सचिव ह्यांना निवेदन देऊन करण्यात आली.
एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल मधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या आम्ही पाठीशी राहून, त्यांना न्याय मिळवून देऊ असा निर्धार ही आदिवासी टायगर सेना चे ऍड जितेश कुळमेथे, डॉ किर्तिकुमार उईके, प्रा हितेश मडावी, डॉ नागनाथ डूडूले, डॉ, ज्ञानेश्वर जुमनाके, मोरेश्वर उईके,यशोधरा उईके,सोज्वळ कुमरे, पूजा कुरसंगे, प्रियंका मडावी,आकाश गेडाम, रज्जु कुरसंगे, वर्षा आत्राम, पौर्णिमा आत्राम, रेखा कुमरे, वैशाली मेश्राम, निशीगंधा मडावी, शुभांगी मेश्राम, माया पेंदोर, निशा मडावी, दीपक पेंदोर,हिमायल मडावी सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी केला.