खामगाव (प्रतिनिधी ) राज्यामध्ये प्रोबेजरी कलेक्टर म्हणुन कार्यरत पुजा खेडेकर यांच्यामुळे दिव्यांगांची बदनामी होत आहे त्यामुळे ही बदनामी थांबविण्याकरिता महामहीम राष्ट्रपती,
नरेंद्र मोदी प्रधानमंत्री, राज्यपाल
यांना विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग संस्थेच्या वतिने तातडीचे निवेदन अतुल पाटोळे तहसीलदार खामगाव बुलढाणा यांच्या मार्फेत देण्यात आले.
आपल्या देशातील महाराष्ट्र राज्यात पुजा खेडकर या आय ए एस अधिकारी रुजू झाल्या आहेत यांच्या मुळे कर्तव्यावर रुजु झाल्या नंतर विविध चर्चा विशेषता दिव्यांगत्वामुळे होत आहेत त्यांच्या सदर कागदपत्राच्या कार्यशैलीमुळे विशेषता दिव्यांग प्रमाणपत्र ज्यामध्ये अस्थिव्यंग, अल्पद्रुष्टी व मानसिकते च्या असलेल्या प्रमाणपत्राच्या सत्यता कि असत्यतामुळे संपुर्ण वास्तविक असलेल्या दिव्यांगांची बदनामी तसेच राज्य देशाची बदनामी होतआहे.
या त्यांच्या क्रुतीची वस्तुनिष्ठ चौकशी ही खुल्या प्रकारात करित सिसीटिव्हीच्या समोर तसेच दिव्यांग
प्रतिनीधी समक्ष करण्यात यावी तसेच हि चौकशी व त्यांच्यावर होत असलेल्या ईतर आरोपाची चौकशी करण्यात यावी. त्यापुर्वी त्यांना सरकारी म्हणजे जनतेच्या पैशातुन वेतनासह ईतर सोई सुविधांचा
त्यांना लाभ देऊ नये तर त्यांच्यावरिल असलेले आरोप सिध्द झाल्यास त्यांच्यावर देशद्रोहाचा नोंदविण्यात येऊन कठोरात कठोर कार्यवाही करावी.
तसेच याच कॅडर मधिल [UPSC] असलेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील [MPSC] असलेले अधिकारी जे दिव्यांग म्हणुन लाभ घेत आहेत यांचीही खुली चौकशी करत रास्त कार्यवाही करण्यात यावी. अश्या वास्तविक दिव्यागाच्या हक्कावर गदा आणणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी हे तातडीचे निवेदन देण्यात आले. यावेळी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन चे अध्यक्ष मनोज नगरनाईक, क्षञुधन ईंगळे,मोहमंद रईस हे हजर होते तर या निवेदनाच्या प्रती राज्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई, लोकसेवा आयोग भारत सरकार नवी दिल्ली , म.रा. लोकसेवा आयोग मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.