सांगली -गेल्या पाच वर्षापासून पर्यावरण संवर्धनासाठी बुधगाव येथील जिव्हाळा फौंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्य सुरू आहे. आजवर शेकडो झाडे लावून ती शंभर टक्के जगून भव्य असा मिनी जंगल प्रोजेक्ट बुधगाव येथे साकारला आहे. याची दखल घेऊन पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. विजयकुमार शहा यांनी या कार्याला भेट देऊन वृक्षारोपण केले.
याप्रसंगी त्यांनी जिव्हाळा फौंडेशनच्या कार्याची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. आणि नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे कार्य पोहोचवण्याची हमी दिली.
याप्रसंगी, जिव्हाळा फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मुळीक, कार्याध्यक्ष मेजर नारायण जाधव, आरटीओ अधिकारी सुनील मुळे, विक्रम पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे, सुभाष पोतदार, विठ्ठल कोळी, मनोज मुळीक, विजय उंटवाले, डॉ. प्रकाश महामुनी, गजेंद्र टेके, सिद्धार्थ गोकावे, वरद हेगडे, रणवीरसिंह घोरपडे उपस्थित होते.