चंद्रपूर:-उत्कृष्ट महिला मंच चंद्रपूरच्या अध्यक्षा सौ छबुताई वैरागडे यांचा जन्मदिवस महिला भगिनींनी 100 झाडे लावून साजरा करण्यात आला. संत तुकाराम महाराजांनी म्हटले होते “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, “जहा हरियाली वह खुशहाली”हे ब्रीद अंगिकारून आज छाया वृक्ष, फळ वृक्ष, वेल वृक्ष, व पुष्पवृक्षाची लागवड करण्यात आली. लावलेल्या सर्व वृक्षांची जबाबदारी संस्थेच्या प्रत्येक महिलांना देण्यात आली व प्रत्येकांनी आपापले झाड जगविण्याची हमी दिली. आज पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे तापमानात दिवसागणित वाढ होताना दिसते, अंगाची लाही लाही होताना दिसते, तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे व अधिकाधिक वृक्ष लागवड करून झाडांचे प्रमाण वाढविणे अगत्याचे झालेले आहे. छबुताई वैरागडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष लागवड व संवर्धनाची मोहीम हाती घेतलेली आहे व ही मोहीम समाजात रुजावी चळवळ व्हावी. आणि आपली वसुंधरा हिरवीगार, निसर्गरम्य, नयनरम्य व्हावी हा संकल्प छबुताईंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे या ईश्वरीय कार्यात सौ अभिलाषा मैंदळकर, योगिता धनेवार,मनीषा भाके,वैशाली आसुटकर, प्रीती लखदिवे, वैशाली भागवत डॉ. नंदकिशोर मैंदळकर, बबन धनेवार, सुशील भागवत यांनी सहभाग घेऊन वृक्ष लागवड यशस्वी केले.