Home Breaking News “त्या” झोपडी अतिक्रमणाविषयी पुन्हा जलजमीन बचाव समिती आक्रमक.! शहरात सरकारी जागेवरील...

“त्या” झोपडी अतिक्रमणाविषयी पुन्हा जलजमीन बचाव समिती आक्रमक.! शहरात सरकारी जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचा आहे समितीचा संकल्प

78

 

साकोली : शहरातील जलजमीन बचाव समिती व शंकरपट समितीच्या अगदी आक्रमक पवित्र्यामुळे गेल्या ०३ जुलैला नवतलाव परीसरातील शासकीय गावठाण जागेवरील भूमाफीयांची अतिक्रमणे नगरपरिषदेने ध्वस्त केलेत. पण एक विशिष्ट झोपडीवर नगरपरिषद मेहेरबान का.? असा संतप्त सवाल आता दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उचलला असून तेही अतिक्रमण काढण्यात यावे. करीता गुरूवार १८ जुलैला शिष्टमंडळ नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना भेटणार आहेत अशी माहिती जलजमीन बचाव समिती अध्यक्ष प्रकाशराणा मेश्राम व शंकरपट समिती अध्यक्ष सपन कापगते यांनी “युवाराष्ट्र दर्शन” ला दिली.
मुख्य साकोली शहरातील नवतलाव परीसरातील शासकीय गावठाण जागेवरील अवैध अतिक्रमणे तातडीने हटवा या मागणीसाठी २६ जून २०२४ ला जलजमीन बचाव समिती व शंकरपट समितीने तहसिल कार्यालयात धडक देत ते निवेदन मुख्याधिकारी यांनाही सादर केले होते. त्यावर सीओ मंगेश वासेकर यांनी लगेच बुधवार ०३ व गुरूवार ०४ जुलै या दोन्ही दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबवून तेथील अवैधरित्या अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई केली. यावर समितीचे सदस्यांनी व शहरवासीयांनी सीओ मंगेश वासेकर यांच्या या जोरदार कारवाईचे स्वागतही केले. परंतु एक विशिष्ट झोपडी अजूनही तिथे असून ती कुणाची झोपडी आहे. आणि ती आताही अतिक्रमण जागेत असून त्या झोपडीवर कारवाई का करण्यात आली नाही.? असा प्रश्न दोन्ही समितीच्या सदस्यांनी उचलला आहे. आणि ही झोपडी तातडीने हटविण्यात यावी यासाठी गुरूवार १८ जुलैला जलजमीन बचाव समिती व शंकरपट समितीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तेथील त्या झोपडी मुळे अजून इतरांचे मनोबल वाढेल आणि पुन्हा शासकीय जागा गिळंकृत करून विकण्याची प्रथा सुरू होईल असे जलजमीन बचाव समिती अध्यक्ष प्रकाशराणा मेश्राम यांचे म्हणणे आहे. तर साकोली शहरातील शासकीय भूखंडावर अतिक्रमणे करून बाहेरच्यांना वाव देणे व शहरातील शांतता भंग करणे अश्या संतापजनक प्रकाराला आळा घालण्यासाठी साकोली सेंदूरवाफा निवासींना एकत्र येऊन लढा देण्याची नितांत गरज असल्याचे मत शंकरपट समिती अध्यक्ष सपन शरद कापगते यांनी व्यक्त केले.
आता नवतलाव परीसरातील शासकीय गावठाण जागेवरील उर्वरित ही पण झोपडी हटविण्यात यावी याकरिता जलजमीन बचाव समिती व शंकरपट समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून गावात असे बाहेरील लोकांचे अतिक्रमणे करा व विका हे गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही असाही इशारा प्रकाशराणा मेश्राम, सपन शरद कापगते, सुरेशसिंह बघेल, विष्णू रणदिवे, उमेश भुरे, विजय दूबे, विनायक देशमुख, विकास परशुरामकर, अमोल हलमारे, ओमप्रकाश गायकवाड, मुकेश हटवार, नरेंद्र वाडीभस्मे, नितीन खेडीकर, विवेक राऊत, जावेद शेख, दिपक थानथराटे, पंकज वासनिक, इमरान पठाण यांसह समितीच्या सदस्यांनी दिला आहे. आणि सदर झोपडी न हटविल्यास नगरपरिषदेपुढे जलजमीन बचाव समिती अध्यक्ष प्रकाशराणा मेश्राम यांसह सदस्यगण हे उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here