Home महाराष्ट्र राज्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा विरोधात आंदोलन करण्याची घोषणा

राज्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा विरोधात आंदोलन करण्याची घोषणा

357

सांगली (विशेष प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अत्यंत महत्त्वाच्या 32 योजनांचे काम गेल्या वीस दिवसापासून पूर्णपणे बंद आहे. उदाहरणार्थ एखादा नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस त्यांच्या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपयाची रक्कम मागणसंदर्भात अर्ज मंडळाच्या पोर्टलवर आज दाखल होत नाही. सर्व सर्व शाळा कॉलेजेस पूर्ववत सुरू झालेली असून सध्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या साठी शिष्यवृत्ती मिळणे अत्यंत आवश्यक आहे परंतु शिष्यवृत्ती चा फॉर्म ऑनलाइन पोर्टल बंद असल्यामुळे भरून घेतला जात नाही. इतर कोणतेही अर्ज भरून घेतले जात नाहीत. त्यामुळे प्रसूती आर्थिक सहाय्य योजना, विवाह आर्थिक सहाय्य योजना व इतर सर्व योजनांचे काम सध्या पूर्णपणे ठप्प आहे. या विरोधात सांगलीमध्ये 12 जुलै 2024 रोजी बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यामध्ये राज्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा विरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमार्फत सर्व काम ऑनलाईन केले जाते परंतु ऑनलाईन पोर्टल सध्या बंद आहे आणि सर्व ऑनलाईन कामकाजाचा सध्या बोजवारा उडालेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांचे संच देण्याचे काम तेवढे जोरात चालू आहे. ते एवढ्यासाठीच चालू आहे की कंत्राटदारांना व अधिकाऱ्यांना त्यातील रोख टक्केवारी मिळत आहे. या भांड्यामुळे कामगारांना कायम स्वरूपी रोजगार मिळणार आहे काय? सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 19 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. त्यापैकी दहा लाख बांधकाम कामगारांना 15 मे पर्यंत भांडी देण्याचे काम होणार आहे. एका भांड्याच्या संच ची किंमत कंत्राटदारांना 8400 इतकी देण्यात येणार आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना भांड्यांचे संच देण्याच्या योजनेची आम्ही स्वागत करीत आहोत परंतु त्याबरोबरच इतर योजना बंद करणे हे बांधकाम कामगारांच्यावर अत्यंत अन्यायकारक असल्यामुळे या अन्यायाविरुद्ध आम्ही योजना सुरू होईपर्यंत आंदोलन करणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडे 23 जून 2024 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 49 लाख 22 हजार 950 अर्ज स्वीकारलेले आहेत. त्यापैकी अर्जावर प्रक्रिया 44 लाख 20 हजार 928 इतकी सुरू आहे. अर्ज मंजुरीसाठीची संख्या 34 लाख 884 इतकी असून इतर अर्जासहित सध्या एकूण नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या 19 लाख इतकी आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सर्व ऑनलाईन काम सध्या ठप्प असल्याने ऑनलाइन काम सुरू होण्यासाठीआंदोलनाची सुरुवात मुख्यमंत्री,कामगार मंत्री व सचिव यांना निवेदन ईमेल द्वारे पाठवून दिले आहे. आणि प्रत्यक्ष 23 जुलै रोजी मुंबई येथे संबंधित मंत्री व सचिवाना भेटणार आहोत. तरी याबाबत कामगार संघटना प्रतिनिधींनी मुंबईत 23 तारखेला उपस्थित राहावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ.शंकर पुजारी व पदाधिकारी साथी सागर तायडे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here