Home चंद्रपूर क्रांतीभूमी चिमूर नगरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चिञाची घोर विटंबना!!

क्रांतीभूमी चिमूर नगरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चिञाची घोर विटंबना!!

489

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३० चिमूर-चिमूर नगर परिषदेच्यावतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचिञ पुस्तक वाचताना व त्या चिञात एक मंदीर तसेच त्यांचे भजन ” हर देशमें तू हर भेषमें तू तेरे नाम अनेक तू एकही हॆ!” हे नगर परिषद कार्यालयाच्या जवळ एका भिंतीवर काढलेले आहे.
या चिञावर कुणीतरी एका अज्ञात इसमाने पान खावून थुंकलेला आहे चिञातील मंदिराच्या खालच्या बाजूस ते स्पष्टपणे दिसत आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे चिञ असलेल्या त्या भिंतीवर केलेले कृत्य अशोभनीय व निंदनीय असुन या घटनेचा तीव्र व जाहीर निषेध प्रचारक राजेंद्र मोहितकर यांनी केलेला आहे.
हे कृत्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा घोर अपमान करणारे आहे.नगर परिषद चिमूरने यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी कारण चिञाच्याखाली नगर परिषद चिमूर असे लिहिले आहे.या चिञातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा दिलेला फोटो हाही व्यवस्थित व योग्य नाही.त्यांचा चेहर्याचा भाग बरोबर रेखाटलेला नाही.
संत महापुरूषांची चिञे काढताना ती व्यवस्थित काढली पाहिजे. त्यांचा चेहरा हुबेहुब असला पाहिजे. नाहीतर जनमाणसात एक वेगळी चर्चा होते. त्याहीपलीकडे जावून एका अज्ञात इसमाने यावर थुंकणे ही तीव्र खेदजनक व दुर्दॆवी बाब आहे. या घटनेचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी राजेंद्र मोहितकर यांनी केलेली आहे. या मागणीसाठी पुढील नियोजन करण्यासाठी 94229 09525 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here