Home यवतमाळ आमरण उपोषण पुन्हा सुरुवात पत्रकार इरफान शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई ची...

आमरण उपोषण पुन्हा सुरुवात पत्रकार इरफान शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई ची मागणी

292

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड दि.२३/०६/२०२४ रोजी वाढदिवस साजरा करून घरी जात असतांना रात्री अंदाजे ९.०० वा. च्या सुमारास आरोपी १) शेख माहर शेख अल्लाउदीन, २) शेख अझर शेख अल्लाउदीन, ३) आरीश खतीब यांनी नांदेड रोड वरील एम. के. कॉम्पलेक्स समोर एकत्र येवुन मला रस्त्यात अडवुन माझ्या डोक्यावर चाकु मारून शेख इरफान यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, याविषयी त्यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला तकार दिली पण त्यानुसार पोलीसांनी हल्लेखोरावर कार्यवाही केली नाही. या गुन्हयातील आरोपीवर कलम ३०७, ११०, पत्रकार सुरक्षा कायदया अंतर्गत व यातील काही गुन्हेगारावर उमरखेड पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्हयाची नोंद असल्याने त्यांच्यावर एमपीडिए कायदया अंतर्गत कारवाई करावी. अशी तक्रार देवुन ही पोलीस अधिकारी यांनी तशी नोंद न घेता गुन्हेगारांना वाचविण्यासाठी अभय दिलेले आहे.

या गुन्हयातील गुन्हेगारांना शाहरूख पठाण व जलील कुरेशी यांनी चिथावणी देवुन प्रोत्साहीत केले आहे. जलील कुरेशी यांच्यावर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये दंगा भडकाविणे आणि प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचा उमरखेड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. तर शाहरूख पठाण हे जातीवाचक वातावरण निर्माण करीत असतो अशी तकार स्वामी विवेकानंद विद्यालय, हरदडा च्या व्यवस्थापकास या पुर्वीच दिल्या गेली आहे.

वरील हल्लेखोरांवर कलम ३०७,११०, पत्रकार सुरक्षा कायदा आणि एमपीडीए कायदया अंतर्गत कारवाई करण्यात यावी व या गुन्हयातील गुन्हेगारांना जलील कुरेशी आणि शाहरूख पठाण यांच्याकडुन चिथावणी देवुन प्रोत्साहीत

करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी यांचेवर सुध्दा कार्यवाही करावी. आणि गुन्हेगारांना अभय देणारे ठाणेदार सोळंखे व ए पी आय सरदार यांची तात्काळ बदली करावी याबाबत मी दि.०२/०७/२०२४ रोजी आमरण उपोषणास बसलो होतो. परंतु मा. अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांनी मला तोंडी आश्वासन दिल्यावरून मी आमरण उपोषण तात्पुर्ते स्थगीत केले होते परंतु मा. अतिरीक्त पोलीस अधिक्षक यांच्या आश्वास्ना प्रमाणे कारवाई आज दि. १०/०७/२०२४ रोजी पर्यंत झाली नसल्याने मी आज दि. १०/०७/२०२४ पासुन नाईलाजास्तव आमरण उपोषण करीत आहे. यातील होणाऱ्या परीणामास संबंधीत प्रशासन जबाबदार राहील. मला व माझे परीवाराला वरील गुंडप्प्रूवत्तीच्या लोकांनपासुन जिवीत्वास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. व जिवात्वास काही कमी जास्त झाल्यास त्यास संबंधीत गुंडप्रवत्तीचे लोक व प्रशासन जबाबदार राहील या मागणीस सह उपोषणास सुरुवात केली आहे उपोषण पाठिंबा संयुक्त पत्रकार संघ तसेच अनेक ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता यांच्या सुद्धा पाठिंबा आहे मागण्या पूर्ण नाही झाले तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here