✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि.९ जुलै) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे दिनांक ८/७/२०२४ रोजी ग्रामपंचायत बिटरगाव (बु.) तालुका उमरखेड येथील ग्राम रोजगार सेवक गजानन बद्रीसिंग रत्ने वय ५१ वर्ष यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार मिळाली.
सदर लेखी तक्रारीवरून दिनांक ८/७/२०२४ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, गजानन बद्रीसिंग रत्ने वय ५१ पद ग्रामरोजगार सेवक, नेमणूक ग्रामपंचायत बिटरगाव (बु) तालुका उमरखेड यांनी स्वतः करिता, तक्रारदार यांच्या वडिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजनेअंतर्गत, ग्राम मन्याळी तालुका उमरखेड येथे गुरांचा गोठा मिळवण्याकरिता केलेला अर्ज, मंजूर करण्याकरिता ७ हजार रुपये लाचेची मागणी करून, लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून दिनांक ८/७/२०२४ रोजी आयोजित केलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान, गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी हनुमान मंदिर प्रवासी थांबाच्या समोर उमरखेड- ढाणकी बिटरगाव रोड उमरखेड येथे, रस्त्यावर स्वतः करिता तडजोडीअंती ५००० रुपये लाच रक्कम, तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष स्वीकारली असता, गजानन बद्रीसिंग रत्ने यांना रंगेहात पकडण्यात आले.पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राह्मणकर, अब्दुल वसीम, सचिन भोयर, सतीश सोनोणे, सुरज मेश्राम, भागवत पाटील व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली.
बॉक्स :- शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान, पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे.