सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०
चंद्रपूर, दि. 9 : अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड, विसापुर (ता. बल्लारपुर) व अनु.जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, चिमुर येथे इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी माध्यमातून सर्व विषय शिकविण्याकरीता शिक्षकांची आवश्यकता आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षासाठी केवळ 11 महिने घडयाळी तासिका तत्वावर मुलाखतीद्वारे भरती होणार असून उमेदवारांनी 15 जुलै 2024 रोजी उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.
अनु.जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड, विसापुर येथे इयत्ता 9 ते 10 वी करीता शैक्षणिक पात्रता एम.ए.बी.एङ (मराठी,हिन्दी, सामाजिक शास्त्र ) तसेच इयत्ता 6 ते 8 वर्ग बी.ए.डी.एड (विषयाचे बंधन नाही) आवश्यक आहे.
अनु.जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर येथे 9 ते 10 वी करीता शैक्षणिक पात्रता बी.ए.बी.एङ (हिन्दी, सामाजिक शास्त्र) बी.ए.बी.एड (विज्ञान) तसेच इयत्ता 6 ते 8 वी करीता बी.एस.सी.डी.एङ (विज्ञान), बी.ए.डी.एङ मराठी माध्यम आवश्यक आहे.
वरील उपलब्ध पदसंख्येनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता अनु.जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड, विसापुर व अनु.जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर येथे सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहावे. उमेदवाराची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक दिल्यानंतर शासन नियमानुसार मानधन अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच मुलाखतीसाठी येण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यांनी कळविले आहे.